शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उच्चपदस्थ चोवीस अधिकारी मलकापुरात

By admin | Updated: February 15, 2015 23:40 IST

आज अभ्यास दौरा : यशस्वी योजनांची करणार पाहणी

मलकापूर : शहरात नगरपंचायतीने यशस्वीपणे राबविलेल्या योजनांचा अभ्यास करण्यासाठी देशातील विविध राज्यांतून तब्बल २४ आयएएस व आयपीएस दर्जाचे अधिकारी सोमवार, दि. १६ रोजी मलकापूरला येणार आहेत. संबंधित अधिकारी तीन दिवस योजनांचा अभ्यास करणार आहेत. मलकापूरच्या पाणी योजनेला ‘पंतप्रधान अ‍ॅवॉर्ड’ व ‘नॅशनल अर्बन वॉटर अ‍ॅवॉर्ड’ हे दोन पुरस्कार मिळाले आहेत. त्याचबरोबर ही योजना सातत्याने सहा वर्षे यशस्वीपणे सुरू आहे. या पाणी योजनेबरोबरच ‘प्रियदर्शनी कन्यारत्न योजना’, ‘प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान’, यासारखे नवनवीन उपक्रम नगरपंचायतीने यशस्वीपणे राबविले आहेत. ‘सोलर-सिटी’ व ४२ कोटींच्या सांडपाणी प्रक्रिया योजनांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे नगरपंचायतीचे सातत्य बघून शासनाने या योजनांच्या यशस्वीतेचा अभ्यास करण्यासाठी २४ अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यानुसार सोमवारी हरियाणाचे बलराज सिंग, छत्तीसगडच्या शालिनी रैना, तेलंगणाचे वीर ब्रह्मा, केंद्रीय अर्थमंत्रालयाचे आनंदराव पाटील यांच्यासह विविध राज्यांतील अधिकारी व महाराष्ट्र मख्य सचिव असे २४ अधिकारी मलकापुरातील योजनांचा अभ्यास करणार आहेत. येणारे सर्व अधिकारी व स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नगराध्यक्षा सुनंदा साठे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी राजेंद्र तेली, जलअभियंता यू. पी. बागडे हे योजनांचे सादरीकरण करणार आहेत. (वार्ताहर)तीन दिवसांचा अभ्यास दौरा शासनाचे व विविध राज्यांतून आलेले २४ आयएसआय अधिकारी मलकापूरचा अभ्यास करण्यासाठी तीन दिवस मलकापुरातच थांबणार आहेत. यशस्वी योजनांचा अभ्यासानंतर ते प्रशासकीय कामकाजासह नगरपंचायत कार्यशाळेतील जिल्हा परिषद शाळा, बचत गट, महिला मंडळे, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्याशीही संवाद साधून तीन दिवसांत शहराचा सर्वांगीण अभ्यास करणार आहेत.