शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माहिती अधिकाराखाली चौदा लाखांची खंडणी : कऱ्हाडात फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:18 IST

कऱ्हाड : माहिती अधिकाराखाली माहिती घेऊन त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करीत प्रकरण मिटवण्यासाठी विस्तार अधिकाऱ्यांकडे चौदा लाखांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार

ठळक मुद्देनिधीतील अनियमितता दाखवून धमकावले

कऱ्हाड : माहिती अधिकाराखाली माहिती घेऊन त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करीत प्रकरण मिटवण्यासाठी विस्तार अधिकाऱ्यांकडे चौदा लाखांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत विस्तार अधिकारी संजय विलासराव सोनवणे (रा. केसरकर पेठ, सातारा) यांनी बुधवारी रात्री कºहाड शहर पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या नावाचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने १९९६ ते २०१३ या कालावधीत ग्रामपंचायतीला मिळणाºया १५ टक्के निधीचा तपशील माहितीच्या अधिकारात मागितला होता. माहितीच्या अधिकाराच्या अर्जावर कार्यवाही झाल्यावर त्या कार्यकत्याला १५ टक्के निधीच्या अहवालाची सविस्तर माहिती देण्यात आली. तो निधी वापरताना अनियमितता झाल्याचे कार्यकर्त्याने समोर आणले. याबाबत त्याने जिल्हाधिकाºयांकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी कºहाड तालुक्यातील प्रत्येक ग्रामसेवकाने सात हजार रुपये असे एकूण १४ लाख रुपये द्यावेत, असा तगादा त्याने प्रशासनातील अधिकाºयांकडे लावला.

माहिती अधिकार कार्यकर्त्याकडून मागितल्या जाणाºया खंडणीचा कॉल अधिकाºयांनी रेकॉर्ड केला. कॉल रेकॉर्ड करून हाप्रकार शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधवयांना सांगितला. जाधव यांनी याप्रकरणाची सलग दोन दिवस चौकशी करून फिर्याद देण्यास सांगितले.विस्तार अधिकारी एकवटलेमाहिती अधिकार कार्यकर्त्याने तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण मिटविण्यासाठी कºहाड तालुक्यातील बहुतांश विस्तार अधिकाºयांशी संपर्क साधल्याचे पोलीस तपासातून समोर येत आहे. तसेच त्याने सर्व विस्तार अधिकाºयांना ठराविक रक्कम सांगून सर्वांची मिळून एकूण १४ लाख रुपये द्या, अशी मागणी केली होती. या मागणीनंतर सर्व विस्तार अधिकाºयांनी एकत्र येऊन संबंधिताच्या धमकीला न जुमानता पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे पोलिसांनी सांगितले.