शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Satara: मधमाशांच्या हल्ल्यात इंदापूर तालुक्यातील चार गिर्यारोहक गंभीर जखमी

By दीपक शिंदे | Updated: February 10, 2025 15:49 IST

Satara Honey Bee Attack: वाई तालुक्यातील पांडवगडावर इंदापूर तालुक्यातील नृसिंहपूर येथील सहा गिर्यारोहक फिरण्यासाठी आले होते. यावेळी अचानक मधमाश्या उठल्या आणि ...

Satara Honey Bee Attack: वाई तालुक्यातील पांडवगडावर इंदापूर तालुक्यातील नृसिंहपूर येथील सहा गिर्यारोहक फिरण्यासाठी आले होते. यावेळी अचानक मधमाश्या उठल्या आणि त्यांच्यावर तुटून पडल्या. या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले, तर दोघे बेशुध्दावस्थेत होते. त्यांना तातडीने वाईच्या दवाखान्यात दाखल केले. ही घटना काल, सोमवारी (दि.१०) पांडवगडावर घडली.अल्हाद दंडवते, निखिल क्षीरसागर, गोपाळ आवटी, गोपाळकर दंडवते अशी जखमींची, तर चैतन्य देवळे, संतोष जापे असे गंभीर जखमींची नावे आहेत. गिर्यारोहकांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याची माहिती समजतात वाई पोलिस व पंचायत समितीतील तालुका वैद्यकीय विभागातील वैद्यकीय पथक पाच रुग्णवाहिकांसह घटनास्थळी दाखल झाले.यावेळी वाई पोलिस ठाण्यातील नितीन कदम, श्रीनिवास बिराजदार तसेच शिव सह्याद्री ट्रेकर्स, दिशा बचाव पथकाचे राजेंद्र खरात, प्रशांत डोंगरे, आशुतोष शिंदे, रोहित मुंगसे, सौरभ जाधव, गुंडेवाडीचे पोलिस पाटील सौरभ पेटकर, गुंडेवाडी धावडी पंचक्रोशीतील युवक, महसूल विभाग, आरोग्य विभाग यांनी शर्थीचे प्रयत्न करून बचावकार्य पार पाडले. गरवारे टेक्निकल फायबर यांनी तत्परतेने रुग्णवाहिका पाठवली. यामुळे जखमींना त्वरित उपचार मिळाले.

वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास दिवसेंदिवस लोप पावत आहे. नैसर्गिक अधिवासात भ्रमण करताना निसर्गाच्या नियमांचे पालन करावे. वास्तविक कोणताही वन्यजीव धोका वाटल्याशिवाय आक्रमण करत नाही. नागरिकांनीही वन्यजीवांशी सहानभूतीपूर्वक वर्तन करावे. - एम. एन. हजारे, वनक्षेत्रपाल, वाई 

निसर्गात गडकोटावर भ्रमंती किंवा गिर्यारोहण करताना निसर्गाचे नियम पाळणे गरजेचे आहे. मधमाशा अंगावर मारलेले परफ्युमने विचलित होतात. परफ्युम मारणाऱ्या माणसांवर जीवघेणा हल्ला करतात. त्यामुळे कोणत्याही जंगलात कोणत्याही निसर्गाच्या ठिकाणी भ्रमण करताना, गिर्यारोहण करताना कोणत्याही प्रकारचा परफ्युम, अत्तर व कोणत्याही प्रकारचे सुवासिक पदार्थांचा वापर न करता जंगलात भ्रमण करावे. - प्रशांत डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते, वाई

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtourismपर्यटनhospitalहॉस्पिटल