आॅनलाईन लोकमतलोणंद (जि. सातारा), दि. २६ : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा यावर्षी १७ जूनला आळंदीतून परंढरपूरकडे प्रस्थान करणार असून, सातारा जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे चार मुक्काम आहे. अशी माहिती ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आली.शनिवार, दि. २४ रोजी सातारा जिल्ह्याच्या सीमेवर ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे नीरा नदीमध्ये श्रीस्नान होऊन लोणंदला संध्याकाळी मुक्काम होणार आहे. दि. २५ जून रोजी चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण होईल व पालखी सोहळा तरडगाव येथे मुक्कामी जाईल. दि. २६ रोजी पालखी फलटण मुक्कामी जाणार आहे. तसेच दि. २७ जून रोजी बरड मुक्काम होऊन पालखी सोहळा २८ जून रोजी सोलापूर जिल्ह्याकडे मार्गस्थ होणार आहे.दरम्यान, पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोणंद पालखी तळ व मार्गाची पालखी सोहळा प्रमुख अभय टिळेकर, विश्वस्त योगेश देसाई, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, तहसीलदार शिवाजीराव तळपे, माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील, नगराध्यक्षा स्नेहलता शेळके-पाटील, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके-पाटील, मुख्य अधिकारी अभिषेक परदेशी, नगरसेवक योगेश क्षीरसागर, हणमंत शेळके, सचिन शेळके, राजेंद्र डोईफोडे, नगरसेविका हेमलता कर्नवर, कुसुम शिरतोडे, शैलजा खरात, स्वाती मंडलकर यांनी पाहणी केली. (वार्ताहर)माउलींचा मुक्काम असणाऱ्या लोणंद पालखी तळाची जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन पालखी तळाचा विस्तार करण्याचा प्रयत्न प्रशासन व नगरपंचायतीने ग्रामस्थांच्या सहकायार्ने करणे गरजेचे आहे.- डॉ. अजित कुलकर्णी, देवस्थान संस्थानचे प्रमुख विश्वस्त
माउलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात चार मुक्काम
By admin | Updated: April 26, 2017 13:23 IST