शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेसाठी चार लाख विद्यार्थ्यांनी केले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 15:03 IST

सातारा जिल्ह्यात सर्व प्राथमिक शाळा, महाविद्यालयांमध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता मतदान २०१७’ हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ९५ हजार ५९५ विद्यार्थ्यांनी या अनोख्या उपक्रमात सहभाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला. विद्यार्थ्यांनी चक्क रांगा लावून मतदान केले.

ठळक मुद्देरांगा लागल्या : २ हजार ७७३ प्राथमिक शाळा व ७४४ हायस्कूल-महाविद्यालयांमध्ये अनोखा उपक्रम

सातारा : जिल्ह्यात सर्व प्राथमिक शाळा, महाविद्यालयांमध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता मतदान २०१७’ हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ९५ हजार ५९५ विद्यार्थ्यांनी या अनोख्या उपक्रमात सहभाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला. विद्यार्थ्यांनी चक्क रांगा लावून मतदान केले. शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत मतदान घेण्यात आले. स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेत जिल्ह्यातील २ हजार ७७३ प्राथमिक शाळांमधील १ लाख ४७ हजार ७५७ व ७४४, महाविद्यालयांमध्ये २ लाख ४७ हजार ८३८ विद्यार्थी असून, एकूण ३ लाख ९५ हजार ५९५ विद्यार्थी सहभागी झाले. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेबाबत माहिती देऊन मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक मतपत्रिका, मतपेटी बॉक्स, काळ्या शाईचा परमनंट मार्कर, विद्यार्थी मतदार यादी आदी शिक्षक उपलब्ध केले. सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. सर्व विद्यार्थ्यांचे मतदान झाल्यानंतर मतदान पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आली. या अनोख्या उपक्रमामुळे स्वच्छतेविषयी नेमकी जागृती करणे सोपे झाले. मतदानानंतर शिक्षकांनी मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान केल्याची निशाणी लावलेल्या बोटांसह फोटो काढून व्हॉट्सअ‍ॅप गु्रपवर टाकले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, शिक्षण सभापती राजेश पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास कुलाळ, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला.हा झाला फायदाविद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जाणीव जागृती झाली. अनेकदा पालक घरात सांगत असतात, पण मुले त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र मतदानाच्या निमित्ताने मुलांना हो किंवा नाही अशी उत्तरे द्यावी लागली असल्याने त्यांच्या मनाची तयारी झाली. या प्रश्नांची उत्तरे मिळाली-घरामध्ये वैयक्तिक शौचालय आहे का- जेवणापूर्वी हात धुता का?-शौचास जाऊन आल्यावर हात धुता का?- पिण्याचे पाणी कसे घेता?