बाळासाहेब रोडे-सणबूर स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ६५ वर्षांनंतर आजही सातर व जिंती ता. पाटण येथील जनता विकासाच्या प्रतीक्षेत आहे. दळणवळण, आरोग्य यासारख्या अनेक नागरीसुविधा उपलब्ध होत नसल्याने येथील ग्रामस्थांना अनेक समस्यांशी झुंज देत जीवन जगावे लागत आहे. सातरसह परिसरातील चार गावांतील रूग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी रूग्णास पाळण्यात घालून चार कि़ मी. चा प्रवास ग्रामस्थांना करावा लागतो. पूर्व बाजूला वांग मराठवाडीचे पाणलोट क्षेत्र तर उत्तर बाजूला व्याघ्र प्रकल्प अशा दुहेरी पेचात अडकलेल्या सातर, जिंती यासह दहा ते बारा छोट्या मोठ्या वाड्या, वस्त्या विकासापासून पूर्णपणे वंचित आहेत. दोन्ही बाजूंनी होत असलेल्या विविध प्रकल्पांमुळे या गावांचा विकास आजही रखडला आहे. आजही या गावांमध्ये दळणवळणाचे साधन उपलब्ध नसल्याने उद्भवणाऱ्या अनेक समस्यांना येथील ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत आहे. सातर, मोडकवाडी, अनुतेवाडी, मार्इंगडेवाडी या ठिकाणी रात्रीच्यावेळी किंवा दिवसाही रूग्णाला दवाखान्यात न्यायचे असेल तर पाळण्यात घालून सुमारे ३ ते ४ किलोमीटर अंतर पायी चालत व चिखल तुडवत डोंगर उतरून जिंतीमध्ये यावे लागत आहे. जिंती येथे आरोग्य विभागाचे उपकेंद्र आहे. मात्र त्याठिकाणी कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी उपलब्ध नसल्याने ते उपकेंद्र म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ असल्याचे ग्रामस्थ सांगतात. पर्याय म्हणून जास्त पैसे खर्च करून भाड्याच्या गाडीेने वृध्द रूग्ण जिंती येथून ढेबेवाडीतील रूग्णालयात हलवावा लागतो. यादरम्यान दीड ते दोन तास वेळ लागत असल्याने रूग्ण दगावण्याच्या घटना घडतात. अनेक समस्यांना झुंज देत येथील लोकांचा जीवनप्रवास आजही सुरूच आहे. या गावांमध्ये विजेचा कायमच लपंडाव सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अंधारातच रहावे लागत आहे. या गावांना वायरमन नसल्याने अशी परिस्थिती ओढावत असल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. जिंती गावाला ग्रामसेवक हवा जिंती ग्रामपंचायतीमध्ये १२ वाड्यांचा समावेश होतो. जवळपास तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावाला कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. याचा फटका विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थांना त्याचबरोबर संपूर्ण गावाला बसत आहे. सध्या या ठिकाणी प्रभारी ग्रामसेवक आहे. पण कायमस्वरूपी पद मिळावे, अशी मागणी ग्रामस्थांची आहे. आतापर्यंत लोकप्रतिनिधींनी आमचा निवडणूक आणि राजकारण या पुरताच वापर करून घेतला. आजपर्यंत आमचे गाव व परिसरातील वाड्या वस्त्या विकांसापासून वंचित आहे. चांगले रस्ते आम्हाला कधी मिळालेच नाहीत. अनेक समस्यांना तोंड देऊन आम्ही थकलो आहोत. आता आम्ही कोणाच्याही थापांना भुलणार नाही. - जयवंत साळुंखे, जिंतीजिंती गावाला ग्रामसेवक हवा जिंती ग्रामपंचायतीमध्ये १२ वाड्यांचा समावेश होतो. जवळपास तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावाला कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. याचा फटका विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थांना त्याचबरोबर संपूर्ण गावाला बसत आहे. सध्या या ठिकाणी प्रभारी ग्रामसेवक आहे. पण कायमस्वरूपी पद मिळावे, अशी मागणी ग्रामस्थांची आहे. आतापर्यंत लोकप्रतिनिधींनी आमचा निवडणूक आणि राजकारण या पुरताच वापर करून घेतला. आजपर्यंत आमचे गाव व परिसरातील वाड्या वस्त्या विकांसापासून वंचित आहे. चांगले रस्ते आम्हाला कधी मिळालेच नाहीत. अनेक समस्यांना तोंड देऊन आम्ही थकलो आहोत. आता आम्ही कोणाच्याही थापांना भुलणार नाही. - जयवंत साळुंखे, जिंतीसातर, मार्इंगडेवाडी, मोडकवाडी, नविवाडी व जिंती परिसरातील छोट्या वाड्यांमधील विद्यार्थ्यांना जिंती येथे १० वी पर्यंतचे तर ढेबेवाडी, तळमावले येथे पुढील शिक्षण घ्यावे लागते. या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे नदीवरील कमी उंचीचा पूल कायमच पाण्याखाली असतो. त्यामुळे दळणवळणाचे दुसरे कोणतेही साधन उपलब्ध होत नसल्याने सातर, मोडकवाडी, नविवाडी, मार्इंगडेवाडी या परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा या परिसरात दळणवळणाचे साधन उपलब्ध नसल्याने येथे काम करण्याचे विविध विभागातील कर्मचारी कामावर वेळेवर हजर होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
रूग्णाला पाळण्यात घालून चार किलोमीटर प्रवास !
By admin | Updated: August 11, 2015 23:27 IST