फलटण (जि. सातारा) : नौदलाचे माजी व्हाईस अॅडमिरल मनोहर प्रल्हाद तथा एम. पी. आवटी (वय ९१) यांचे रविवारी मध्यरात्री निधन झाले. फलटण तालुक्यातील विंचुर्णी येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे.जिंदादिल व्यक्तिमत्त्व असलेले आवटी यांच्या निधनाने नौदलातील एका महान पर्वाचा अस्त झाला, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.आवटी यांनी नौदलात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. आवटी यांचा जन्म ७ सप्टेंबर १९२७ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबई व पुण्यात झाले. १९४५ मध्ये ते रॉयल इंडियन नेव्हीत दाखल झाले.
माजी व्हाईस अॅडमिरल आवटी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:12 IST