शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षांवर फसवणुकीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 22:06 IST

न्यायालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक

पांचगणी : न्यायालयात नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याच्या आरोपावरून महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्षांसह एकावर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष संतोष मारुती आखाडे (रा.महाबळेश्वर) व नीलेश रामदास थोरात (रा.शिवाजीनगर, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शुभम ढेबे, बाळू गावडे, भगवान राजगे, राहूल कोंढाळकर, युवराज राक्षे या युवकांनी सातारा येथे पोलीस अधीक्षकांना तक्रार अर्ज दिला होता. या अर्जानुसार  एकूण ३६  युवकांची फसवणूक झाली असल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे.पाचगणी पोलीस ठाण्यात शांताराम धोंडिबा ढेबे (वय ४४, रा.कासवंड, ता. महाबळेश्वर) यांनी आखाडे व थोरात यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे, ‘माझा मुलगा शुभम ढेबे याला कोर्टात क्लार्कची नोकरी लावतो, असे आमिष त्यांनी दाखवले. त्या बदल्यात रोख अडीच लाख आणि उरलेले अडीच खात्यात जमा करण्याचे मला आखाडे यांनी सांगितले. नोकरीच्या आशेने आम्ही  फोन करून आखाडे यांना विचारले असता त्यांनी महाबळेश्वर येथे बोलावले. आखाडे यांचे महाबळेश्वर येथील घरी गेलो असता, त्यांनी घरात बसलेल्या नीलेश थोरात यांची ओळख करून दिली. त्याने मीच तुमच्या मुलाला नोकरीला लावणार आहे, असे सांगितले. त्यावेळी शाळेची कागदपत्रे आणि रोख अडीच लाख रुपये आखाडे यांच्याकडे दिले. नंतर थोरात याचा मुंबईतील दिघी बँकेचा खाते क्रमांक  दिला. या खात्यावर राहिलेली अडीच लाखांची रक्कम भरण्यास सांगितले. त्याशिवाय नोकरी मिळणार नाही, असे सांगितले. त्यानंतर आम्ही घरी आलो. नंतर सातारा जिल्हा बँकेच्या भिलार शाखेतून ७०००० रुपये काढून त्या खातेवर पाठवले. तसेच भिलार येथील महाराष्ट्र बँकेतून १ लाख ८० हजार रुपये काढून ती ही रकम नीलेशच्या खातेवर भरली आहे.’ सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर. एन. कापले व त्यांचे सहकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :fraudधोकेबाजी