शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा हजारांची लाच घेताना वनरक्षक जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 14:31 IST

Forest Bribe Sataranews Crimenews- लाकडाच्या वखारीवर कारवाई न करण्यासाठी पंधरा हजारांची लाच स्वीकारताना कऱ्हाड तालुक्यातील चोरे येथील वनरक्षकाला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी पाल, (ता. कऱ्हाड) येथे करण्यात आली.

ठळक मुद्देपंधरा हजारांची लाच घेताना वनरक्षक जाळ्यात पाल येथे कारवाई : वखारीवर कारवाई टाळण्यासाठी स्वीकारली लाच

सातारा: लाकडाच्या वखारीवर कारवाई न करण्यासाठी पंधरा हजारांची लाच स्वीकारताना कऱ्हाड तालुक्यातील चोरे येथील वनरक्षकाला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी पाल, (ता. कऱ्हाड) येथे करण्यात आली.राहुल बजरंग रणदिवे (वय ३४, रा. कोयना सोसायटी, विलासपूर, गोडोली सातारा) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या वनरक्षकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, पन्नास वर्षीय संबंधित तक्रार हे पाल, (ता. कऱ्हाड) येथील राहाणारे आहेत.

त्यांच्या लाकडाच्या वखारीवर कारवाई न करण्यासाठी चोरे बीटचा वनरक्षक राहुल रणदिवे याने त्यांच्याकडे सुरूवातीला २५ हजारांची मागणी केली. मात्र, तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदाराने साताऱ्यातील लाचलुचपत कार्यालयात येऊन रितसर लेखी तक्रार नोंदवली.

त्यानंतर लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता रणदिवे हा लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. सायंकाळी पाल येथे अधिकाऱ्यांनी सापळा लावला असता रणदिवे हा पंधरा हजारांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात अडकला.पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, पोलीस नाईक ताटे, खरात आणि येवले यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणSatara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी