शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

एसटीच्या धडकेत दाम्पत्य जागीच ठार

By admin | Updated: November 22, 2015 00:01 IST

अतीतजवळील घटना : विरुद्ध दिशेने आल्याने अपघात

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अतीत, ता. सातारा येथे एसटीने दिलेल्या भीषण धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य जागीच ठार झाले. हा अपघात शनिवारी दुपारी दोन वाजता झाला. शंकर अण्णासो निकम (वय ४८), द्रोपदा शंकर निकम (४३, रा. सासपडे, ता. सातारा) अशी अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिराळा डेपोची एसटी (एमएच १४ बीटी ३८५७) मुंबईहून शिराळ्याकडे निघाली होती. दुपारी दोन वाजता ही एसटी अतीत येथील शाहू पॉलिटेक्निकजवळ आली. याचवेळी विरुद्ध दिशेने निकम दाम्पत्य दुचाकीवरून येत होते. एसटीने या दाम्पत्याला डाव्या बाजूने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यांच्या दुचाकीचे हॅण्डलपासून दोन भाग झाले. काही फूट उंच उडून दोघेही महामार्गावर जोरदार फेकले गेले. त्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातात एसटीच्या पुढील बाजूचे नुकसान झाले. अपघातानंतर महामार्गावर काहीवेळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. एसटी चालक अब्दुल निजाम दिवाण (रा. देऊर, ता. शिराळा)यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (प्रतिनिधी) ‘ते’ करत होते आल्याचे व्यापार शंकर निकम हे आल्याचे व्यापार करत होते. त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने सासपडेमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांची एक मुलगी प्राजक्ता ही बारावी सायन्समध्ये तर मुलगा हृषीकेश नववीच्या वर्गात शिकत आहे. आई-वडिलांच्या अपघाती मृत्यूमुळे या दोन्ही मुलांवर पोरकं होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.