शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Satara News: कराड विमानतळावर लवकरच सुरू होणार फ्लाईंग अकॅडमी; प्रशिक्षणासाठीची तीन विमाने दाखल 

By प्रमोद सुकरे | Updated: January 4, 2023 14:32 IST

मुंबई, पुण्यानंतर आता कराडात सोय 

प्रमोद सुकरेकराड : कराड येथील विमानतळरावर दमानिया एअरवेजच्यावतीने येत्या महिनाभरात फ्लाईंग अकॅडमी सुरू होणार आहे. त्याची सध्या तयारी सुरू असून प्रशिक्षणासाठीची तीन विमाने देखील कराड विमानतळावर दाखल झाली आहेत. आणखी दोन विमाने लवकरच येणार असल्याचे खात्रीपूर्वक समजते. मुंबई, पुणे, बारामती, धुळेनंतर ही सुविधा कराडमध्ये उपलब्ध होत आहे.  कराड विमानतळाचा वाणिज्यिक वापर व्हावा, यासाठी  माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रयत्न केले. दमानिया एअरवेजने महाराष्ट्र शासनाशी करार करून फ्लाईंग अकॅडमी सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकली. फेब्रुवारी २०१९ मध्ये परवेज दमानिया यांनी कराड विमानतळाची पाहणी करून फ्लाईंग अकॅडमीची घोषणा केली होती. त्यानंतर सुविधा उपलब्ध केल्या. त्यामुळे प्रशिक्षणासाठी कराड विमानतळ सज्ज झाले आहे.  प्रशिक्षणासाठी एकूण पाच विमाने या अकॅडमीत असणार आहेत. यातील सेन्सा १७२ही दोन विमाने तर सेन्सा १५२ हे एक विमान येथील विमानतळावर दाखल झाले आहे. यातील दोन विमाने दोन सीटची तर एक विमान चार सीटचे आहे. आणखी एक सहा आसनी विमान व पाईपर विमान दाखल होणार आहे. ही विमाने ठेवण्यासाठी व मेन्टेनन्ससाठी विमानतळावर बाजूला एअरक्राफ्ट हँगरची निर्मिती करण्यात आली आहे. याचठिकाणी टेक्निकल स्टाफ काम करणार आहे.

एकावेळी ५० विद्यार्थी घेणार प्रशिक्षणया अकॅडमीचे बेस इनचार्ज म्हणून पंकज पाटील हे काम पाहात आहेत. एका वर्षात स्थानिकांसह देशभरातील सुमारे ५० विद्यार्थी येथे प्रशिक्षण घेतील. त्यांचा कालावधी २ वर्षे इतका आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर खासगी विमान कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.  

मुंबई, पुण्यानंतर आता कराडात सोय पुणे, बारामती नंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह दक्षिण महाराष्ट्रात फ्लाईंग स्कूल नव्हते. मात्र आता कराड विमानतळावर प्रशिक्षणाची सोय उपलब्ध होत आहे. या माध्यमातून रोजगार निर्मितीसह स्थानिक पातळीवर आर्थिक विकासाला देखील मोठी चालना मिळणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडAirportविमानतळ