शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

बाणगंगा नदीला पूर; जनजीवन विस्कळीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 23:19 IST

फलटण : फलटण तालुक्यात शनिवारपासून पावसाची संततधार कायम आहे. अनेक ठिकाणी नदी, नाले, ओढ्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले ...

फलटण : फलटण तालुक्यात शनिवारपासून पावसाची संततधार कायम आहे. अनेक ठिकाणी नदी, नाले, ओढ्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरात तसेच शेतात पाणी शिरल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागली.ग्रामीण भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. रविवारी फलटण व साखरवाडी येथील आठवडे बाजारावर पावसाचा मोठा परिणाम झाला. नेहमीप्रमाणे विक्री न झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. सातारा-फलटण मार्गावर मिरगाव येथे व फलटण-पंढरपूर रस्त्यावर खडकहिरा येथील पुलावरून पावसाचे पाणी वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. बाणगंगा नदीलाही पूर आला असून, सस्तेवाडी, कांबळेश्वर वाहतूक सकाळी काही काळ बंद ठेवण्यात आली. कुरवली बुद्रुक, आंदरुड, मिरढे, निंबळक, वाठार स्टेशन येथील ओढ्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. जिंती येथे ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने सर्व रस्ते जलमय झाले. तर कोळकी येथे विजेच्या तारांवर झाडाच्या फांद्या पडल्याने काही काळ वीजपुरवठा खंडित झाला.सस्तेवाडी, खुंटे, आसू, विडणी या ठिकाणी प्रचंड पाऊस पडला असून, येथील जनजीवन विस्कळीतझाले आहे. दरम्यान, पावसाने तालुक्यातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहिल्याने मतपेट्या व कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाºया गाड्यांनाही याचा फटका बसला.सोमवारी होणाºया मतदानावरही पडण्याची शक्यता असल्याने नेते मंडळी, कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.शेतीपिकांच्या नुकसानीची भीती...रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत फलटण शहरात ३४ मिलिमीटर, बरड ७४, आदर्की ५६, आसू ३५, तरडगाव ६४, गिरवी ३०, राजाळे ४८, होळ ५२ तर वाठार निंबाळकर येथे ४३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. हा पाऊस असाच राहिला तर शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकºयांमधून व्यक्त केली जात आहे.