शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

साताऱ्याच्या रस्त्यावर पाच हजार धावपटू

By admin | Updated: September 14, 2014 23:56 IST

सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धा : इथिओपियाच्या टॅमार्ट गुडेटा, जेफ्री मारिया यांची बाजी; ४८ आंतरराष्ट्रीय स्पर्धकांचा सहभाग

सातारा : सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेत अतिशय वेगाने धावत परदेशी धावपटूंच्या गटात इथिओपियाच्या टॅमार्ट गुडेटा याने २१ किलोमीटरचे अंतर केवळ एक तास, आठ मिनिटे, दोन सेकंदात पार करीत साताऱ्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तिसऱ्या सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. महिलांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये परदेशी विभागाच्या गटात इथिओपियाच्याच जेफ्री मारिया या महिलेने एक तास दहा मिनिटे आणि तीस सेकंदात अंतर पार करून महिला गटाचे विजतेपद मिळविले.सातारा मॅरेथॉन असोसिएशन आयोजित व महाराष्ट्र राज्य व सातारा जिल्हा अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या मान्यतेने हिल मॅरेथॉन स्पर्धेला देशभरातून प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत ५ हजार २०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. ४८ आंतरराष्ट्रीय स्पर्धकांनी उपस्थिती लावली होती. २१ किलोमीटर पुरुष गटात युनुस असफाने एक तास आठ मिनिटे २५ सेकंदात द्वितीय तर टिसेराय अ‍ॅडगुना याने एक तास आठ मिनिटे ३६ सेकंदात तृतीय क्रमांक मिळविला. परदेशी महिला गटात २१ किलोमीटरसाठी इथिओपियाच्या जेफ्री मारियाने प्रथम, केनियाच्या सिफ्रॉ रेटसने द्वितीय तर इथिओपियाच्या तारुल ग्लेसने तृतीय क्रमांक मिळविला. भारतीय २१ किलोमीटर पुरुष गटात विनोद कुमार एक तास १४ मिनिटे २२ सेकंद, तानाजी नलावडे एक तास १५ मिनिटे ३७ सेकंद, ज्ञानेश्वर मोरया एक तास १५ मिनिटे ३९ सेकंदात अंतर पूर्ण करून विजेते ठरले. भारतीय २१ किलोमीटर महिला गटात नीलम रजपूत, रेशम सिंग, स्रेहल गाला हे विजेते ठरले. २१ किलोमीटर ज्येष्ठ पुरुष गटात पांडुरंग चौगुले, अशोक नाथ, उदय महाजन हे विजेते ठरले. तर २१ किलोमीटर महिला गटात वैशाली कस्तुरे, प्रतिमा हेबळे, एस. जी राधाकृष्णन या विजेत्या ठरल्या. हाफ मॅरेथॉनच्या सिनिअर सिटीझन पुरुष गटात केरबा गुरव, सुरेश पिल्लई, रावसाहेब सूर्यवंशी विजेते ठरले. २१ किलोमीटर ज्येष्ठ महिला गटात चित्रा नाडकर्णी, खुर्शिद मिस्त्री, दुर्गा सुनील हे विजेते ठरले. अतिज्येष्ठ २१ किलोमीटर पुरुष गटात पंकज देसाई, व्ही. रामचंद्र राव, जयंत नवरंग हे विजेते ठरले. हाफ मॅरेथॉनच्या सिनिअर सिटीझन महिला गटात मीता रामकृष्णन विजेत्या ठरल्या. विजेत्यांचा गौरव सन्मानपदक, रोख रक्कम व स्मृतिचिन्हे देऊन करण्यात आला. स्पर्धा समिती प्रमुख डॉ. संदीप काटे यांनी स्वागत केले. एम. सी. चैतन्य यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रतापराव गोळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) पहिले बक्षीस सव्वा लाखांचे... जिल्हा पोलीस परेड ग्राउंडवरून खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, गजेंद्र पवार, अजित मुथा यांनी विविध गटांच्या या स्पर्धेला झेंडा दाखवून प्रारंभ केला. यामध्ये २१ किलोमीटर, दहा किलोमीटर व पाच किलोमीटर अशा तीन विभागांत ही स्पर्धा झाली. विविध गटांमध्ये मिळून स्पर्धेमधील विजेत्यांना एकूण दहा लाख रुपयांच्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यात पहिले बक्षीस एक लाख २५ हजार रुपयाांचे होते.