भुर्इंज : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. वाई तालुक्यातील भुर्इंज येथे काम सुरू असलेल्या उड्डाण पुलाचा स्लॅब बुधवारी रात्री अचानक कोसळला. याप्रकरणी रिलायन्स कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक ब्रिजेश कुमार यांच्यासह पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. या अंतर्गत भुर्इंजजवळ उड्डाण पुलाचा स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना बुधवारी रात्री अचानक तो कोसळला. याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाईची मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक संघटनांमधून होत होती.पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत बुधवारी रात्रीच रिलायन्स कंपनीचे अधिकारी आणि या प्रकल्पाचे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार, उड्डाण पूल अभियंता राजेश कुमार, कटारिया तसेच कंपनीचे उपठेकेदार, आयटीडी कंपनीचे अधिकारी राजेंद्र शेलार, विवेक कटुसाळे या पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे. उड्डाण पुलाचा स्लॅब कोसळल्याप्रकरणी आपणाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना गुरुवारी सकाळी समजली. त्यानंतर त्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यातच पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी गुरुवारी सकाळी आठ वाजता घटनास्थळाची पाहणी केली. काम बंदच्या सूचनामहामार्ग विस्तारीकरण कामात प्रथमच अशी घटना घडली आहे. त्यामुळे या उड्डाणपूल कामाचा गुणवत्ता अहवाल मागविला आहे. तो अहवाल येईपर्यंत काम बंद ठेवण्याच्या सूचनाही पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केल्या आहेत.
प्रकल्प व्यवस्थापकासह पाचजणांवर गुन्हा
By admin | Updated: April 29, 2016 00:22 IST