शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील पाच तळी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 23:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शहरात घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींची उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. या सर्व गणेशमूर्तींचे शहरातील विविध पाच ठिकाणच्या तळ्यांमध्ये विसर्जन करण्यात येणार आहे. यामध्ये पालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चार कृत्रिम तळ्यांचा समावेश आहे.शहरातील घरगुती व सार्वजनिक गणेशमंडांच्या मूर्तींचे विसर्जन याही वर्षी पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शहरात घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींची उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. या सर्व गणेशमूर्तींचे शहरातील विविध पाच ठिकाणच्या तळ्यांमध्ये विसर्जन करण्यात येणार आहे. यामध्ये पालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चार कृत्रिम तळ्यांचा समावेश आहे.शहरातील घरगुती व सार्वजनिक गणेशमंडांच्या मूर्तींचे विसर्जन याही वर्षी पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे. विसर्जनासाठी पालिकेने चार कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. यापैकी गोडोली, हुतात्मा स्मारक व दगडी शाळा परिसरातील कृत्रिम तळ्यांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.मोती तळ्याच्या समोर असलेल्या पालिकेच्या जलतरण तलावातही यावर्षी घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. या तलावात जवळपास साडेसात लाख लिटर पाण्याची गरज भासणार असून, तलाव भरण्यासाठी शुक्रवारपासून पाणी सोडण्यात आले आहे. शाडूमातीचा पाण्यावर परिणाम होऊ नये, यासाठी पालिकेच्या वतीने तलावात ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्यात आली आहे.सार्वजिनक गणेश मंडळांच्या मोठ्या मूर्तींचे विसर्जन प्रतापसिंह शेती फार्म हाऊसच्या कृत्रिम तलावात केले जाणार असून, या तलावाचे खोदकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. सोमवारपर्यंत (दि.२८) हे काम पूर्ण होणार असून, यानंतर तलावात प्लास्टिक लायनर टाकून पाणीसाठा केला जाणार आहे.पालिकेकडून निर्माल्य कलशगणेशोत्सवात पावित्र्य व स्वच्छता राखली जावी, यासाठी पालिकेच्या वतीने विसर्जन ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात येणार आहे. पालिकेसह विविध सामाजिक संस्थांच्या वतीनेही निर्माल्य कलश उपलब्ध केले जाणार आहेत. विसर्र्जन ठिकाणी पालिकेच्यावतीने पाण्याच्या टाक्याही ठेवल्या जाणार आहेत. भाविकांनी कलशामध्येच निर्माल्य टाकावे, असे आवाहन करण्यात आले आहे.