शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पाच धरणांनी गाठली ‘पन्नाशी’

By admin | Updated: June 26, 2015 22:56 IST

‘कोयना’ निम्म्यावर : जिल्ह्यातील सात धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

सचिन काकडे -सातारा -सातारा : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. लहान-मोठ्या एकूण १५ धरणांपैकी पाच धरणांमध्ये पन्नास टक्के पाणीसाठा झाला असून, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे ‘कोयना’ही निम्म्यावर आले आहे. धरणांमधील पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी सात धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.सातारा जिल्ह्यात दुष्काळी भागासह अनेक ठिकाणी यंदा मान्सूनचे दमदार हजेरी लावली. पावसामुळे बंधारे, ओढे, विहिरींची पाणीपातळी वाढल्याने अनेक ठिकाणचा पाणीप्रश्न मिटला आहे. धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने धरणांमधील पाणीसाठाही झपाट्याने वाढत आहे. जून महिना संपण्याअगोदरच जिल्ह्यातील कण्हेर, उरमोडी, तारळी, वीर, मोरणा गुरेघर ही धरणे पन्नास टक्के भरली आहे. उत्तरमांड, महू, हातगेघर आणि नागेवाडी या धरणांच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे.जून महिन्यात केवळ २० दिवसांमध्येच जिल्ह्यातील अर्ध्या धरणांनी पन्नाशी गाठली असून, पावसाचा जोर पाहता ही धरणे जुलै महिन्यात पूर्ण क्षमतेने भरतील, असे सध्याचे चित्र आहे. सात धरणांमधून विसर्ग पाण्याचा येवा पाहता धरणांमधील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सात धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. उरमोडीतून प्रतिसेकंद दोन हजार ६०० क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तर वीर धरणातून ८००, तारळी, १४४.७०, हातगेघर १४८, महू ६३०, वांग ४१३ क्यूसेक तर मोरणा-गुरेघर धरणातून प्रतिसेकंद एक हजार ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. धरणेक्षमताआजचागेल्यावर्षीचापाणीसाठापाणीसाठा कण्हेर१०.१०५.९७३.२०उरमोडी९.८०७.७२५.१३तारळी५.८५३.२९४.०६वीर९.८३४.८००.७७३मोरणा-गुरेघर१.८३०.८५००.२३१ कोयनेत दहा दिवसांत एक हजार मिलिमीटर पाऊसअरुण पवार ल्ल पाटणकोयना पाणलोट क्षेत्रात १९ जूनपासून पावसाने थैमान घातले. गुरुवारी रात्रीपासून पाऊस अचानकपणे मंदावला असला तरी गेल्या दहा दिवसांत कोयना, महाबळेश्वर व नवजा या पर्जन्यमापकांवर अनुक्रमे १०३९, ११४४, १२१९ मिलिमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली. त्यामुळे १ जून रोजी २९ टीएमसी वर असलेला कोयना धरणातील पाणीसाठा आता ४८.७३ टीएमसी म्हणजेच अर्ध्यावर पोहोचला आहे.कोयना धरणाच्या भिंतीपासून कोयना नदीचे उगमस्थान असलेल्या महाबळेश्वरपर्यंतचा ६० किलोमीटर अंतरावर एकूण ९ पर्जन्यमापकांवर पावसाची नोंद होत असते. यामध्ये कोयना, नवजा, महाबळेश्वर, प्रतापगड, वळवळ, सोनाट, कारगाव, काठी बामणोली अतिपर्जन्य ठिकाणांचा समावेश आहे. येथून येणाऱ्या पाण्याचा साठा कोयना धरणात होतो. दरवर्षीच्या पावसाळ्यात कोयना धरण पूर्णक्षमतेने भरेपर्यंत सरासरी ४५०० हजार मिलिमीटर पाऊस होतो. यंदा मात्र जून महिन्यातच पावसाने जोरदार मारा केल्यामळे २६ जूनपर्यंत एक हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या दहा दिवसांतच कोयना धरणात विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणाची पाणीपातळी २१०५ फूट ९ इंच इतकी झाली आहे. पाऊस ओढ देईल की पूरस्थिती येईल?जून महिन्यातच पावसाने कहर केल्यामुळे धरणातील पाणीसाठा ५० टीएमसीवर पोहोचला आहे. त्यामुळे आगामी दिवसात जरी पावसाने ओढ दिली तरी काळजीचे कारण नाही. मात्र, जर पुन्हा जुलै महिन्यात पाऊस बळावला तर मोठ्या प्रमाणात कोयना धरणातून पाणी सोडावे लागेल व पूरस्थिती निर्माण होईल.