शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

‘माझी वसुंधरा ४.०’मध्ये मान्याचीवाडी राज्यात प्रथम, एक कोटीचे बक्षीस 

By नितीन काळेल | Updated: September 27, 2024 23:20 IST

राज्यातील २२ हजार २१८ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता.

सातारा : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने माझी वसुंधरा अभियान ४.० चा निकाल जाहीर केला असून, दीड हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात पाटण तालुक्यातील मान्याचीवाडीने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. यामुळे गावाला एक कोटीचे बक्षीस मिळाले आहे, तर या पुरस्कारामुळे सातारा जिल्ह्याचा डंका पुन्हा वाजला आहे.

पृश्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान राज्यात २०२० पासून राबविण्यास सुरूवात झाली, तर माझी वसुंधरा अभियान ४.० हे राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांत १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ पर्यंत राबविण्यात आले. यात राज्यातील २२ हजार २१८ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेचा निकाल लागला आहे. यामध्ये मान्याचीवाडी गावाने दीड हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळवत एक कोटीचे बक्षीस प्राप्त केले आहे, तर या गटातच दुसरा क्रमांक नाशिक जिल्ह्यातील आवळी दुमाला, तर तिसरा क्रमांक अहमदनगर जिल्ह्यातील तिगाव गावाने प्राप्त केला आहे.

सातारा पालिकेला आठ कोटी...या अभियानात, तसेच भूमी थिमॅटिक उपक्रमात सातारा नगरपालिकेने राज्यात पहिला क्रमांक मिळवला. याबद्दल पालिकेस आठ कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. यामुळे सातारा शहरवासीयांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मान्याचीवाडी गावाने माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या गावाने आतापर्यंत अनेक अभियान, उपक्रमांत यश मिळवून सातारा जिल्ह्याचे नाव राज्य, देशात नेहमीच उंचावले आहे. मान्याचीवाडी गावाचे अभिनंदन, तसेच जिल्ह्यातील इतर गावांनीही अभियानांमध्ये सहभाग घेऊन यश मिळवावे.- याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसर