शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील पहिले हरभरा केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 23:07 IST

पिंपोडे बुद्रुक : सध्याचा बाजारभाव लक्षात घेता शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्याच्या हेतूने त्यांना किमान किफायतशीर भाव मिळावा,

ठळक मुद्देशहाजी भोईटे : कोरेगावातील मुख्य बाजार आवारात खरेदीला सुरुवात

पिंपोडे बुद्रुक : सध्याचा बाजारभाव लक्षात घेता शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्याच्या हेतूने त्यांना किमान किफायतशीर भाव मिळावा, या हेतूने कोरेगावातील मुख्य बाजारात सातारा जिल्ह्यातील पहिले हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचा जास्तीतजास्त शेतकºयांनी लाभ घेण्याचे आवाहन खरेदी-विक्री संघाच्या वतीने चेअरमन शहाजी भोईटे यांनी केले आहे.शेतकºयाच्या मालाला केंद्र शासनाने निर्धारित केलेली किमान आधारभूत किंमत मिळावी, या हेतूने कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ, शेती उत्पन्न बाजार समिती व मार्केटिंग फेडरेशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रब्बी हंगाम २०१७-१८ करिता बाजार समिती कोरेगाव येथील मुख्य बाजार आवारात जिल्ह्यातील पहिले हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, नुकतेच त्याचे उद्घाटन सहकारी संस्था सहायक निबंधक संजय सुद्रिक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शहाजी भोईटे, बाजार समीतीचे सभापती प्रतापराव कुमुकले, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे देसाई तसेच बाजार समिती खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन, सर्व संचालक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्र शासनाचे कृषी सहकार व पणन विभागामार्फ त रब्बी हंगामामध्ये जास्तीत जास्त हरभरा उत्पन्न अपेक्षित होते, त्यामुळे ज्यादा आवक ज्याल्याने बाजार भाव किमान अधारभूत किमतीपेक्षा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती, अशाप्रकारे शेतकºयांची गळचेपी होऊन आर्थिक नुकसान होऊ नये, या हेतूने खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.या ठिकाणी केंद्र शासनाने ठरविलेल्या किमान आधारभूत किमतीने म्हणजेच प्रतिक्विंटल ४४०० रुपये दराने हरभरा खरेदी करण्यात येणार आहेत.

यासाठी शेतकºयांनी खरेदी केंद्रावर आॅनलाईन नोंदणी करता हरभरा या पीक पाण्याच्या नोंदीसह सातबारा उतारा, आधारकार्ड, बँक पासबुकची प्रत घेऊन येणे अनिवार्य केले आहे.दरम्यान, शेतकºयांनी खरेदी केंद्र्रावर आणलेला माल स्वच्छ असावा, मालाची आर्द्र्रता कमाल १४ टक्के असावी, तो कडीकचरा किंवा मातीमिश्रित नसावा, असे अवाहन खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक राजेंद्र येवले यांनी केले आहे.सोयाबीन विक्रीला प्रतिसादयापूर्वी देखील खरेदी-विक्री संघाच्या वतीने खरीप हंगामात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करून ६१८२ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले होते. 

एकीकडे वाढत्या भांडवली खर्चाच्या तुलनेत बाजारभावामध्ये होणारी दराची घसरण लक्षात घेता शेतकºयांना आपल्या मालाला किफायतशीर बाजारभाव मिळण्याच्या हेतूने खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, जास्तीत जास्त शेतकºयांनी त्याचा फायदा घ्यावा.- शहाजी भोईटे, चेअरमन,कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघ

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbusinessव्यवसाय