शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
3
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
4
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
5
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
6
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
7
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
8
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
9
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
10
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
11
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण
12
Gold Silver Rate 16 june: सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत
13
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा छगन भुजबळांनी हट्ट सोडला; म्हणाले, 'पद हवेच असे नाही' 
14
शिंदेंच्या शिवसेनेतील गटबाजी अखेर शमली, दोन्ही गटांचे अखेर मनोमिलन! दादा भुसेंच्या मध्यस्थीला यश
15
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
16
कोणी बोलल्यावर आपण हसलो तर आरोपी होतो का?
17
ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळेल ६०,००० पेक्षा जास्त पेन्शन, 'या' योजनेत करा गुंतवणूक
18
"घाबरत नाही...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर रवीना टंडनचा एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास, म्हणते...
19
Donald Trump: ...तर अमेरिकी फौजा तुटून पडतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा!
20
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...

मायणीत कोरोना काळात चार लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 17:24 IST

CoronaVirus In satara : वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असतानाही रस्त्यावरील व बाजारपेठेतील गर्दी कमी होताना दिसत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कडक अंमलबजावणीचा निर्णय घेतल्यानंतर मायणी पोलिसांकडून कोरोना काळात आजअखेर विनाकारण फिरणाऱ्या व मॉर्निंग वॉक करणाऱ्यांकडून सुमारे चार लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमायणीत कोरोना काळात चार लाखांचा दंड वसूल पोलिसांची मोहीम : मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवरही कारवाई

मायणी : वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असतानाही रस्त्यावरील व बाजारपेठेतील गर्दी कमी होताना दिसत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कडक अंमलबजावणीचा निर्णय घेतल्यानंतर मायणी पोलिसांकडून कोरोना काळात आजअखेर विनाकारण फिरणाऱ्या व मॉर्निंग वॉक करणाऱ्यांकडून सुमारे चार लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण सातत्याने सापडत असलेल्या सातारा जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून कडक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, निर्बंध असतानाही विनाकारण रस्त्यावर, बाजारपेठेत व क्रीडांगणावर फिरणाऱ्यांची संख्याही कमी होताना दिसत नव्हती.त्यामुळे मायणी पोलिसांनी येथील चांदणी चौक, मुख्य बसस्थानक परिसर, चितळी रोड, मायणी पोलीस दूरक्षेत्रांतर्गत येणाऱ्या विविध गावांमध्ये तसेच जिल्हा हद्दीवर कडक बंदोबस्त ठेवला आहे. या बंदोबस्तामध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाची, नागरिकांची चौकशी केली जात होती. यामध्ये योग्य कारण असणाऱ्या वाहनचालकांना व नागरिकांना थोडाफार दिलासा दिला जात आहे.

विविध प्रकारच्या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे, नाना कारंडे, बाबूराव खांडेकर, नवनाथ शिरकुळे, योगेश सूर्यवंशी, प्रवीण सानप, प्रकाश कोळी, महिंद्र खाडज या पोलीस कर्मचाऱ्यांसह वैभव सानप, जाकीर डांगे, अरुण घार्गे, महेंद्र काटकर, अमर घाडगे, अभिजीत सानप, अशोक जाधव, किरण माळी या होमगार्डनी सहभाग घेतला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर