शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पीसीपीएनडीटीप्रकरणी गुन्हा दाखल करा : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 21:12 IST

कोणत्याही स्वरुपाची वैद्यकीय पदवी नसताना बेकायदा गर्भलिंग तपासणी व मशीन बाळगून पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाथा खाडे याच्यावर न्यायालयात गुन्हा दाखल करण्याचे

ठळक मुद्दे‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर कारवाई

सातारा : कोणत्याही स्वरुपाची वैद्यकीय पदवी नसताना बेकायदा गर्भलिंग तपासणी व मशीन बाळगून पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाथा खाडे याच्यावर न्यायालयात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी जिल्हा वैद्यकीय अधीक्षकांना दिले आहेत.

केवळ नववी पास असूनही डॉक्टरच्या थाटात खुलेआम गर्भवती महिलांचे गर्भलिंग निदान करणाºया नाथा सहदेव खाडे (रा. पिंपरी, ता. माण) याला सातारा स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह पकडले. पोलीस तपासामध्ये नाथा खाडे हा मोटारसायकलवर गर्भलिंग मशीन घेऊन गावोगावी फिरत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला तक्रारदारच मिळत नव्हते. म्हणून त्याच्यावर गुन्हाच दाखल होऊ शकला नाही. त्यामुळे नाईलाजस्व त्याला सोडून देण्यात आले होते. हे वृत्त सर्वात प्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले.

त्यानंतर पोलिसांनी पंचनाम्यासाठी तातडीने जप्त केलेली मशीन औंध ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाºयांना दिली. त्यांनी ते मशीन घेतले; मात्र जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र पाठवून पोलिसांनी हे मशीन दबाव टाकून माझ्याकडे दिल्याचे कळवले. वैद्यकीय अधिकाºयांनी पोलिसांना अपेक्षित असलेला अहवाल दिला. मात्र, गुन्हा कोणी दाखल करायचा, यावरून पोलीस आणि वैद्यकीय अधिकाºयांमध्ये तू तू-मैं मैं झाली. अखेर आरोग्यमंत्र्यांनी याप्रकरणात लक्ष घातल्यानंतर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना नाथा खाडेवर पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.एलसीबी मशीनची माहिती कशी देणारजिल्हाधिकाºयांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, नाथा खाडे याने मशीन कोठून आणले, ते कोणाकडून खरेदी केले, त्याअगोदर ती कोणाकडे होती, तसेच या मशीनद्वारे गर्भलिंग निदान केले आहे काय? याबाबतचा अहवाल स्थानिक गुन्हे शाखेककडून प्राप्त करून घ्यावा. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने नाथाला अटकच न केल्याने त्याच्याकडे पुरेशी चौकशीच झाली नाही. 

संबंधितावर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे औंध ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाºयांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. लवकरच गुन्हा दाखल होईल.अमोद गडीकर-जिल्हा शल्यचिकित्सक 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhospitalहॉस्पिटल