वाई : दारू पिऊन छोटा हत्ती वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वाई पोलिसांनी गुरुवारी (दि. ३१) रात्री पावणेनऊच्या सुमारास गस्त सुरू असताना वाई ते मांढरदेव रस्त्यावरील चांदणी चौकात केली. याबाबत माहिती अशी की, वाई पोलिसांत गुन्हा दाखल ३१ डिसेंबरच्या रात्री वाई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता तरीही काहीजण मद्यपान करून पार्टी करताना दिसत होते. त्यांच्यावर वाई पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामध्ये जावली तालुक्यातील पार्टेवाडी येथील सुशांत तुळशीदास पार्टे (वय २४) हा दारू पिऊन छोटा हत्ती (एमएच ११ सीएच ८२४८) हे वाहन चालवत असल्याचे आढळून आहे. सुशांत चालवत निघाला होता. पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यास रोखले. त्याने मद्यपान केल्याचे निदर्शनास येताच त्याच्यावर मोटर वाहन कायदा ‘कलम १८५’ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारू पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:56 IST