शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृती गुणवत्ता यादीत सातारचे अर्धशतक

By admin | Updated: June 30, 2017 14:01 IST

जिल्ह्यातील पन्नास विद्यार्थ्यांचे यश

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. ३0 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी)व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत सातारा जिल्ह्यातील पन्नास विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे.वडुज ता. खटावच्या छत्रपती शिवाजी हायस्कुलच्या कष्णुर शेख हिने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण भागात ९३.९५ टक्के मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. या शाळेतील एकूण ६९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवत जिल्ह्यात झेंडा फडकावला आहे. तर पूर्व माध्यमिक मध्ये ३०.५८ टक्के तर पूर्व माध्यमिकमध्ये १४.५७ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत, अशी माहिती शिक्षण अधिकारी पुनीता गुरव यांनी दिली.पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) मध्ये जिल्ह्यातील १ हजार ७७१ शाळांमधील १९ हजार ९१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली . ६ हजार १४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी ४७४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. तर राज्याच्या गुणवत्ता यादीत शहरी विभागात जिल्ह्यातील १७ विद्यार्थी तर ग्रामीण विभागात ८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीत (आठवी) परीक्षेसाठी जिल्ह्यातील ८२६ शाळांमधील १७ हजार ५८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २ हजार ५२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ४५७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. या परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत शहरी ६ तर ग्रामीण विभागात १९ विद्यार्थ्यांनी बाजी मारली. शिष्यवृत्तीच्या जावळी पॅटर्न म्हणून ओळख असणाऱ्या जावळीतील एकही विध्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत यंदा चमकला नाही.गेल्या अनेक वर्षांपासून जावळीतील विद्यार्थी हे राष्ट्रीय, राज्य गुणवत्ता यादीत चमकत आले आहेत. शिष्यवृत्तीचा जावळी पॅटर्न राज्यात गाजला आहे. मात्र यावर्षी जावळीतील एकही विध्यार्थी राष्ट्रीय,राज्य गुणवत्ता यादीत चमकला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.