शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हातोहात खपल्या काश्मिरी सफरचंदच्या पंधरा हजार पेट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:36 IST

प्रशांत कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : खवय्येगीर सातारकर जिभेचे चोचले भागविण्यासाठी कधीच मागे नसतात. साताऱ्यातील बाजारपेठेत काही ...

प्रशांत कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : खवय्येगीर सातारकर जिभेचे चोचले भागविण्यासाठी कधीच मागे नसतात. साताऱ्यातील बाजारपेठेत काही दिवसांपूर्वी काश्मिरी सफरचंदांची आवक वाढली होती. हे सफरचंद खरेदी करण्यासाठी सातारकरांनी गर्दी केली होती. तब्बल पंधरा हजार पेट्या कधी संपल्या हे फळविक्रेत्यांनाही समजले नाही. यातून लाखो रुपयांची उलाढाल झाली.देशात काश्मीरमधील सफरचंदला मोठी मागणी असून, त्यातील ‘डेलिसन’ या जातीला ग्राहकांमधून अधिक पसंती आहे. सध्या डेलिसन या सफरचंदला बाजारात एका पेटीला सुमारे ५०० ते १२०० पर्यंत दर मिळतो. या सफरचंदचा वर्गवारीनुसार दर ठरविला जातो. डिझेल दरवाढीमुळे यंदा सफरचंदच्या वाहतूक खर्चात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.एका ट्रकमध्ये एक हजार पेट्या येत असून, जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये १५ ट्रकमधून १५ हजार सफरचंदच्या पेट्या दाखल झाल्या होत्या. एका पेटीत सुमारे १५ किलो सफरचंद भरतात. काश्मीरच्या सफरचंदाचा १५ आॅगस्ट ते फेब्रुवारी, मार्चपर्यंत हंगाम सुरू असतो. त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात सफरचंदला स्टोअरमध्ये दाखल केले जाते. त्यानंतर दरात वाढ झाली की पुन्हा बाजारपेठेत आणले जाते. नवरात्रीत केला जाणाºया उपवासाच्या काळात ते बाजारात आणले होते.‘जिल्ह्यात काश्मीर डेलिसन अन् हिमाचलचा सिमला दोन प्रकारच्या सफरचंद येत असतात. यातील काश्मिरी डेलिसन या सफरचंदला सातारकरांची अधिक पसंती मिळाली,’ अशी माहितीही किरकोळ विक्रेत्यांनी दिली.नवरात्रोत्सवात घरोघरी नऊ दिवस उपवास केला जातो. या काळातच हे फळ बाजारात आल्याने त्यांना चांगली मागणी व दर मिळाला, अशी माहिती फळे विक्रेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.