शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

माढ्याच्या उमेदवारीवरून टेंभुर्णीमध्ये खलबते..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 23:04 IST

सातारा : लोकसभा निवडणुकीला अवधी असला तरी माढा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकीय चर्चांना ऊत आला आहे. त्यामुळेच यावेळी खासदार विजयसिंह ...

सातारा : लोकसभा निवडणुकीला अवधी असला तरी माढा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकीय चर्चांना ऊत आला आहे. त्यामुळेच यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आणि फलटणचे रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याविरोधात मोट बांधण्याचे काम सुरू झाले आहे. त्याची बैठक टेंभुर्णीत झाली असून, अकलूज आणि फलटणची दोन्ही घराणी सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आता माढा लोकसभा मतदार संघात सुरू झाली आहे.माढा लोकसभा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला. पहिल्यावेळी या मतदारसंघाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तर दुसऱ्यावेळी राष्ट्रवादीचेच विजयसिंह मोहिते-पाटील हे निवडून आले; पण त्यांचा विजय हा सहजासहजी झाला नाही. कारण, त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत असणारे व सध्याचे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांना जेरीस आणले होते. अवघ्या काही हजार मतांच्या फरकाने मोहिते-पाटील यांचा विजय झाला आहे. आता तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी अनेकजण इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पुन्हा उमेदवारी मागितली आहे. तसेच माणमधील माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख हे ही राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. तर अधूनमधून राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचेही नाव पुढे येत आहे.माढा लोकसभा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीकडे आहे. आताही हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाकडून अनेकजण निवडणूक लढविण्यास तयार आहेत. त्यातच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनीही फलटणमध्ये शनिवारी शरद पवार आणि पक्ष आदेश आल्यास कोणतीही निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. संजीवराजेंचे हे वक्तव्य नक्कीच माढा लोकसभा मतदारसंघासाठी असणार आहे. त्यामुळेच कदाचित मतदारसंघातील काहीजण अकलूज आणि फलटणकरांच्या विरोधात एकत्र येत आहेत. त्यासंदर्भातच शनिवारी टेंभुर्णी येथे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या फार्म हाऊसवर बैठक झाली. या बैठकीला सातारा जिल्ह्यातून आमदार जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, माळशिरसचे उत्तमराव जानकर आदी उपस्थित होते.टेंभुर्णीतील या बैठकीत अकलूजचे मोहिते-पाटील आणि फलटणच्या रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या विरोधात येण्याचा निर्णय झाल्याचे समजते. कसेही करून या घराण्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचाच निर्धारही झाल्याची चर्चा आहे.जलाशयातल्या बोटीत संजयमामांचं सारथ्यटेंभुर्णी येथे जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना घेऊन संजय शिंदे हे तिथल्याच जलाशयावर गेले. तिथल्या बोटीत मस्त सफर करण्यात आली. या बोटीचं सारथ्य स्वत: मामांनी केलं. त्यानंतर अंधार झाला. त्यामुळे सर्वजण मामांच्या फार्म हाऊसवर आले. तोपर्यंत इतर आणखी काहीजण तेथे आले होते. या साºयांची गुप्त बैठक झाली. त्यावेळी माढ्यातून मोहिते-पाटील आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या घराण्यातील कोणी का उमेदवार असेना; पण आपण त्यांच्या विरोधात एकच उमेदवार द्यायचा. पक्ष, चिन्ह नंतर ठरवू, असाही निर्णय झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.