शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

कटगुणला आणखी काही कोंबड्यांचा मृत्यू, नमूने बर्ड फ्लूच्या तपासणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 10:41 IST

Bird Flu Satara- खटाव तालुक्यातील कटगुण येथे आणखी काही कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने पाहणी सुरू केली असून नमूने बर्ड फ्लूच्या तपासणीसाठी पाठविले आहेत. तर लोणंदमधील मृत कावळ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील अन्य काही अहवालांची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देकटगुणला आणखी काही कोंबड्यांचा मृत्यूलोणंदच्या कावळ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह

सातारा : खटाव तालुक्यातील कटगुण येथे आणखी काही कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने पाहणी सुरू केली असून नमूने बर्ड फ्लूच्या तपासणीसाठी पाठविले आहेत. तर लोणंदमधील मृत कावळ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील अन्य काही अहवालांची प्रतीक्षा आहे.बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आतापर्यंत माण तालुक्यातील दोन गावांत तर खंडाळा आणि कऱ्हाड  तालुक्यातील प्रत्येकी एका गावांत मृत कोंबड्या आढळून आल्या होत्या. यामधील खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडीमधील कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूने झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते.

कऱ्हाड तालुक्यातील हणबरवाडी आणि माणमधील हिंगणी व बिदालमधील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. असे असतानाच खटाव तालुक्यातील कटगुणमध्ये शनिवारी काही कोंबड्या मृत्यूमुखी पडल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्या अंगावर वणही होते.

मुंगसाच्या हल्ल्यात या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. असे असतानाच रविवारी आणखी काही कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी कटगुणला पोहोचले. त्याठिकाणी अधिक माहिती घेत सर्वेक्षण सुरू केले. तसेच मृत कोंबड्यांचे नमूने बर्ड फ्लूच्या तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.दरम्यान, १० दिवसांपूर्वी लोणंद येथे मृत कावळे आढळले होते. या कावळ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह म्हणून आला आहे. पण, लोणंद परिसरातील मरिआईचीवाडीतील मृत कोंबड्यांचा अहवाल बाधित आल्यानंतर या परिसरातच संक्रमित झोन जाहीर करण्यात आला होता. तसेच सर्वेक्षण करुन उपाययोजना सुरू करण्यात आल्या होत्या.शिरवळ, तडवळेसह अन्य अहवालाची प्रतीक्षा...जिल्ह्यातील शिरवळ, भिलार, मलवडी आणि तडवळेमधील मृत कावळ्यांचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या नमून्यांची प्रतीक्षा आहे. तर जावळी तालुक्यातील कुडाळमधील मृत कोंबड्यांचा अहवाल लवकरच प्राप्त होईल, अशी माहिती संबंधितांनी दिली.

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लूSatara areaसातारा परिसरKaradकराड