शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

ाूर्वेला फेरा; पश्चिमेला पेरा !

By admin | Updated: July 20, 2014 23:19 IST

बळीराजा पुन्हा संकटात : पेरणी खोळंबली, पाण्याची टंचाई

नितीन काळेल - सातारामाण, खटाव, फलटण हे दुष्काळी तालुके. एक-दोन वर्षे चांगली गेली की येथे दुष्काळ हा ठरलेलाच. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचे उशिरा आगमन झाले असले तरी तो जिल्ह्याच्या पश्चिम भागातच कोसळत आहे. पश्चिमेकडे उशिरा पेरा सुरू झाला असून, पूर्वेकडील भागात मात्र अद्यापही दुष्काळाचाच ‘फेरा’ असल्याचे वास्तव आहे. या भागातील फलटण तालुक्यात आतापर्यंत साडेतीन टक्के तर खटाव तालुक्यात १३ टक्के इतकीच पेरणी झाली आहे. दुष्काळी भागात अद्यापही पाण्यासाठी भटकंती सुरू असून, अनेक गावांना टँकर सुरू आहेत. ‘राजाने मारले अन् पावसाने झोडपले’ तर दाद मागायची कुणाकडे, असे आपल्याकडे म्हटले जाते. तशीच परिस्थिती येथील बळीराजावर येऊन ठेपलेली आहे. जुलै महिना संपत आला तरी म्हणावी अशी पेरणी झालेली नाही.जुलै महिना संपाण्यासाठी १० दिवस बाकी आहेत. या १० दिवसांत चांगला पाऊस झाला तरच सर्वत्र पेरण्या होतील, असे सांगण्यात येत आहे. नाही तर किमान दुष्काळी चार तालुक्यांतील खरीप हंगाम पावसाअभावी वाया जाणार हे निश्चित झालेले आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो. प्रत्येक तालुक्यात त्या-त्या प्रमाणे पिके घेण्यात येतात. जिल्ह्यात खरीप हंगामात साधारणपणे १८ टक्के क्षेत्रावर बाजरी, ज्वारी १५ टक्के, भुईमूग १५ टक्के, ऊस १२ टक्के, सोयाबीन पावणेसात टक्के तसेच इतर कडधान्ये साडेनऊ टक्के क्षेत्रावर घेण्यात येतात.यंदा पावसाने चांगलीच ओढ दिली. जुलै महिन्याच्या मध्यानंतर पाऊस होऊ लागला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागात उशिरा का होईना पेरण्यांना, भात लागण या कामांना सुरुवात झालेली आहे. दि. १६ जुलैपर्यंत जिल्ह्यात अवघी ३८.६० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे तीही उसाचे क्षेत्र धरून. म्हणजे जिल्ह्यात आणखी ६० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरण्या बाकी आहेत.या पेरणीत पाटणला ६०.६५ टक्के क्षेत्रावर, जावळी तालुका ४२.०८ टक्के, कऱ्हाड ७२.९७ टक्के अशी पश्चिम भागात पेरणी झाली आहे. पाटण तालुक्यात सोयाबीनची १०० टक्के तर भात लागण ७० टक्के क्षेत्रावर झाली आहे. पश्चिम भागातील हे चित्र असताना पुर्वेकडील भागात मात्र, सुरूवातीच्या काळात तुरळकच पाऊस झालेला आहे. त्यानंतर दडी मारलेला पाऊस अद्यापही हुलकावणीच देत आहे. त्यामुळे येथील पेरण्या पूर्णपणे रखडल्या आहेत. फलटण तालुक्यात आतापर्यत फक्त ३.५२ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. खटाव १२.९३ टक्के, खंडाळा १७.५३ टक्के तर माण तालुक्यात २१ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. गतवर्षी दोन लाख क्युसेक अन् यंदा विसर्ग ‘शून्य’बळीराजाचे डोळे आभाळाकडे : धरणांत समाधानकारक पाणीसाठा नाही सातारा : गतवर्षी आजच्या दिवशी जिल्ह्यात धो-धो सरी कोसळत होत्या आणि कऱ्हाड येथून कृष्णा पुलाखालून पाण्याचा होणारा एकूण विसर्ग २.८ लाख क्युसेक इतका होता. यावर्षी मात्र ‘शून्य’ टक्के विसर्ग आहे. विशेष म्हणजे, पाऊस इतका जोरात कोसळत होता की, कृष्णा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत होती. आता मात्र नद्याही आटल्या आहेत अन् धरणांनीही तळ गाठला आहे. दरम्यान, पावसाचे आगमन लांबणीवर पडले तर भयावह दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.जून संपून जुलैचा दुसरा आठवडा संपला तरी पाऊस गायबच होता. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात मात्र पावसाने थोडी आशा दाखविली असून, काही ठिकाणी समाधानकारक पाऊस आहे. परिणामी धरणांमध्येही पाणीसाठा होऊ लागला आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणातून प्रतिदिन १९६0 मेगावॅट वीजनिर्मिती होते, मात्र गेले तीन आठवड्यांपासून धरणातून वीजनिर्मितीची प्रक्रिया थांबली आहे. रविवारी, दि. २0 रोजी सांयकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणात २९.१४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. धरणातील पाणीपातळी २0७४.१0 फूट इतकी होती तर धरणातील पाण्याचा येवा २९,४0५ क्युसेक इतका होता. पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागणार आहे. त्यातच अनेक गावांमध्ये आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. प्रमुख धरणांतील पाण्याने तळ गाठला असला तरी उरमोडी आणि तारळी प्रकल्प वगळता कोणत्याही धरणात समाधानकारक पाणीसाठा नाही.सातारा जिल्ह्यात कोयना, धोम, कण्हेर, धोम-बलकवडी, उरमोडी, तारळी, मोरणा-गुरेघर, उत्तरमांड, नागेवाडी, वांग-मराठवाडी, महू, हातगेघर त्याचबरोबर पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असणारे वीर, भाटघर, नीरा-देवघर ही प्रमुख धरणे आहेत. या धरणांतील साठवण क्षमता २०० टीएमसीच्या आसपास असून, आजमितीस असणारा पाणीसाठा ५० टीएमसी इतका आहे. ही धरणे भरली तरच जिल्ह्यातील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मिटतो. दरम्यान, प्रमुख धरणांतील पाणीसाठा आणि इतर लहान-मोठ्या तलावांमध्ये होणारा पाणीसाठा लक्षात घेता जिल्ह्यातील एकूण साठवणक्षमता २३० टीएमसीच्या आसपास आहे. कोयना धरणात आजमितीस २८.३२ टीएमसी पाणीसाठा झाला असून, गतवर्षी आजच्या दिवशी असणारा पाणीसाठा ८३.८१ टीएमसी इतका आहे. कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही ७६.९३ टीएमसी इतका पाणीसाठा आवश्यक आहे. जिल्ह्यातील अन्य धरणांमध्येही हीच परिस्थिती आहे. कोणत्याही धरणांत समाधानकारक पाणीसाठा नाही. उरमोडी आणि तारळी प्रकल्पांत चांगला पाणीसाठा आहे. गतवर्षीचा जुलै महिन्याचा दुसरा आठवडा लक्षात घेता यंदा मात्र, पावसाने त्या तुलनेत पाठच केली असल्याचे प्रकर्षाने नमूद करावे लागत आहे. गतवर्षी जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसाचे तांडव सुरू होते. परिणामी विविध धरण प्रकल्पांतील पाणीसाठाही वेगाने वाढत होता. आजमितीस मात्र, तशी परिस्थिती नाही. जिल्ह्यात पश्चिम भागात गेल्या तीन आठवड्यांत मुसळधार पावसाचे तांडव सुरू होते. परिणामी विविध धरण प्रकल्पांत पाणीसाठा नियंत्रित करण्याचे आव्हान धरण व्यवस्थापनापुढे असतानाच शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत विविध प्रकल्पांतून १२० टीएमसी पाणी वाहून गेले आहे. सर्वाधिक ५७.३९ टीएमसी पाणी कोयना धरणातून वाहून गेले आहे. दरम्यान, पावसाचे तांडवनृत्य असेच सुरू राहिले तर सप्टेंबरअखेर वाहून जाणारे पाणी २५० टीएमसीच्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.सातारा जिल्ह्याच्या बहुतांशी भागात दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत अनेक ठिकाणी भयावह दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. खास करून दुष्काळी भागात पाणीटंचाई कमी प्रमाणात जाणवत असली तरी इतर गावांत मात्र त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यात पाणलोटची कामे चांगली झाल्यामुळे दुष्काळी गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या अजून उद्भवलेली नाही. दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यांत मात्र भयावह परिस्थिती आहे.सातारा जिल्ह्यात दरवर्षी सरासरी दहा ते साडेदहा हजार मिमी एकूण पावसाची नोंद होते. यामध्ये महाबळेश्वर तालुक्याचे प्रमाण ६५ टक्क्यांच्या पुढे असते. मात्र, यावर्षी एकूणच परिस्थिती बिकट आहे. आतापर्यंत झालेला एकूण पाऊस ३०७० मिमी इतकाच आहे. तालुकानिहाय सरासरी २७९ मिमी इतकीच आहे. (प्रतिनिधी)अजूनही पाऊस अत्यल्पच..!कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोयना, नवजा आणि महाबळेश्वर ही तीन प्रमुख पाऊस कोसळणारी केंदे्र आहेत. येथील पावसावर महाराष्ट्राचे भवितव्य आणि पर्यायाने कोयना धरणातील पाणीसाठ्याचे भवितव्य अवलंबून असले. कोयना धरण पाणलोट क्षेत्रांतील कोयनानगर येथे रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ८८ मिमी पावसाची नोंद झाली. आजअखेर येथे १६४२ मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी अतिशय अत्यल्प आहे. नवजा येथे ७६ मिमी पावसाची नोंद झाली असून, आजअखेरचा पाऊस १७८८ मिमी आहे. महाबळेश्वर येथे १०० मिमी पाऊस झाला असून, येथे आजअखेर १३२० मिमी पावसाची नोंद झाली आहे.गतवर्षी चिटेघरमधून ३१ टीएमसी पाणी नदीपात्रात...पाटण तालुक्यातील केरा नदीवर असणाऱ्या चिटेघर लघु प्रकल्पातून जुलै महिनाअखेर ३१ टीएमसी पाणी वाहून गेले होते. ही बाब लक्षात घेतली तरी गेल्यावर्षी पडलेल्या पावसाची तीव्रता लक्षात येते. यावर्षी मात्र, काहीच नाही. कऱ्हाड येथील कृष्णा पुलाखालून वाहून जाणारे पाणी ‘शून्य’ आहे. गतवर्षी जुलै महिन्यात येथून वाहणारे पाणी प्रतिसेकंद दोन लाख आठ हजार ९४७ क्युसेक इतके होते. दरम्यान, नीरा नदीवर असणाऱ्या वीर धरणातून १६.१९ टीएमसी पाणी नदीपात्रात सोडले होते. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी पडलेला पाऊस लक्षात घेता, यावर्षी काहीच नाही. यापूर्वी २००५, २००६ आणि २०११ मध्येही जोरदार सरी कोसळल्या होत्या.धरणएकूण क्षमताआजचा पाणीसाठागतवर्षीचा साठाआजचा पाऊसएकूणकोयना१0५.२५२९.१४८३.८१८८ १६४२धोम १३.५00३.५१८.२६१६१४२ कण्हेर १0.१00४.२00७.१६१२१६३उरमोडी 0९.८00५.६२0७.१९४३२८९धोम-बलकवडी 0४.0८0.१२२0२.९२८६७0२नीरा-देवघर ११.७३0२.८४0८.१९७३५२३वीर 0९.८३0१.0४0५.७९0१५६भाटघर २३.७५0४.३८१६.४00४१५१तारळी0५.८५0४.४७८0५.0१७२५३२६मोरणा-गुरेघर 0१.८३00.९६९00.९५९७७७४उत्तरमांड 0१.0३0.३९७00.७१३२५३२५महू0१.१000.0५१00.0४१११२२0हातगेघर 00.२६00.0१९00.९७१३२३३नागेवाडी00.२३00.0१३00.१४७0४२२१-पावसाळ्यात येणारी पूरस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीस समर्थपणे तोंड देण्यासाठी भीमा खोरे अंतर्गत नीरा उपखोरे पूरनियंत्रण कक्ष क्रमांक नीरा उजवा कालवा विभाग, फलटण येथे स्थापन करण्यात आल्याची माहिती नीरा उजवा कालवा विभाग फलटणचे कार्यकारी अभियंता तानाजी जेंगटे यांनी दिली.-या पूरनियंत्रण कक्षात विभागीय स्तरावर वीर मोठे प्रकल्प, नेर, राणंद, आंधळी, तिसंगी, म्हसवड मध्यम प्रकल्प धरणाच्या पूर नियंत्रण कामासाठी कार्यकारी अभियंता टी. एम. जेंगटे यांची नीरा खोरे पूरनियंत्रण कक्ष प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. -या कक्षात उपकक्ष प्रमुख म्हणून उपकार्यकारी अभियंता एस. पी. डोईफोडे यांची नेमणूक करण्यात आली असून, कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण ज्यावेळी इतर कामामुळे उपलब्ध नसतील त्यावेळी डोईफोडे कक्षप्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. -कोणत्याही धोक्याची माहिती अथवा अन्य कोणती कल्पना या कार्यालयात द्यावयाची झाल्यास दूरध्वनी/फॅक्स ०२१६६-२२२२२८ अथवा ८९७५९६५१००, ९३७०३२४३३२ या मोबाईलवर क्रमांक साधावा, असे आवाहन जेंगटे यांनी केले आहे.महाबळेश्वरला सर्वाधिक पाऊसजिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर नाही. सर्वाधिक ११४.६ मिमी पावसाची नोंद महाबळेवर तालुक्यात झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. जिल्ह्यात रविवारी पहाटे आणि शनिवारी दिवसभरात एकूण १९५.५ मिमी तर सरासरी १७.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस तालुकानिहाय असा, कंसात आजपर्यंत झालेला एकूण पाऊस मिमी मध्ये असा : सातारा १२.५ (१८१.८), जावळी ३४.४ (३८०.३) कोरेगाव ० (७०), कऱ्हाड ३.४ (१३७.३), पाटण २४.१ (४0२.६), फलटण ० (४२), माण ० (७५.५), खटाव ० (९७.७), वाई ६.१ (८१.२) महाबळेश्वर ११४.६ (१५५२.७), खंडाळा ०.४ (४९.२) मिमी. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या उदभवू नये म्हणून पिण्याचे पाणी राखून ठेवण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यात ५५ विहीरीचे अधिग्रहण केले आहे. यामध्ये माण तालुक्यातील २०, खटाव १६, कोरेगाव २, खंडाळा १, फलटण ३, वाई ९, जावली ३ आणि कऱ्हाड तालुक्यातील १ विहीरीचा समावेश आहे.