शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

चारा मुबलक; दुष्काळी भागात घेऊन जा; बामणोली भागातील शेतकऱ्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 22:51 IST

लक्ष्मण गोरे । लोकमत न्यूज नेटवर्क बामणोली : यावर्षी परतीचा पाऊस झाला नसल्याने बामणोली भागातील डोंगररांगातील चारा सुकू लागला ...

लक्ष्मण गोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कबामणोली : यावर्षी परतीचा पाऊस झाला नसल्याने बामणोली भागातील डोंगररांगातील चारा सुकू लागला आहे. यामुळे शेतकºयांनी यावर्षी लवकरच गवत कापणीस सुरुवात केली आहे. तर यंदाही या भागात चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, दुष्काळी भागालाही येथील चाºयाचा उपयोग होऊ शकतो. कापून राहिलेले गवत नेण्याचे आवाहनही येथील शेतकºयांनीही केले आहे. त्यादृष्टीने विचार करण्याची गरज आहे.जावळी तालुक्यातील बामणोली भागातील शेतकरी शेतीबरोबरच पशुपालनाचा व्यवसाय करतात. संपूर्ण उन्हाळा व पावसाळ्यातील दोन महिन्यांसाठी शेतकरी गवत कापून त्याच्या गंजी लावून ठेवतात. हा चारा जनावरांसाठी खाद्य म्हणून महत्त्वाचा ठरतो. तर येथील पश्चिमेकडे डोंगररांगा तीव्र उताराच्या आहेत. दिवसभर डोंगरात जाऊन गवत कापणे अत्यंत अवघड व कष्टाचे काम असते. अनेक शेतकरी सौदे व मजुरीनेही गवत कापणी करतात. सध्या या परिसरातील अनेकजण मुंबईला नोकरी, व्यवसाय करत असल्यामुळे पशुधन खूपच कमी झाले आहे. त्यामुळे गवताची कमी प्रमाणात कापणी होते. तर सध्या डोंगरातील गवत मात्र दरवर्षीप्रमाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.सध्या शेतकरी अत्यंत कमी प्रमाणात गवत कापणी करणार आहेत. त्यामुळे शिल्लक चारा थोड्या दिवसांनी वणव्यात जळून खाक होणार आहे. या चाºयाचा कोणालाही फायदा होणार नाही. वणवा लागणार नाही, यासाठी काही पावले उचलली तर चारा वाचू शकतो. तसेच या चाºयाचा दुष्काळी भागातील जनावरांना फायदा होऊ शकतो. यासाठी सर्वांनी आतापासूनच सावधगिरी बाळगली पाहिजे. येथील चारा दुष्काळी भागातील जनावरांपर्यंत कसा पोहोचेल, यासाठी नियोजन आवश्यक ठरणार आहे.सह्याद्रीच्या डोंगरामध्ये मुबलक चारा: रोजगाराची संधीसह्याद्रीच्या डोंगरामध्ये मुबलक चारा उपलब्ध आहे. स्थानिक शेतकºयांची गरज भागून उरलेला चारानंतर वणव्यात जळून भस्मसात होतो.शिल्लक चाºयाचा वणव्यापासून बचाव केला तर दुष्काळी भागाला याचा खूपच फायदा होईल. तसेच स्थानिक शेतकºयांना याच गवत कापणीतून रोजगारही मिळले. यासाठी सर्वांनी योग्य नियोजन करण्याची गरज आहे.