शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बनावट मुखत्यारपत्र केल्याप्रकरणी वडील, मुलावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 11:56 IST

बनावट मुखत्यारपत्र तयार करून सातबाऱ्यावर नोंद केल्याप्रकरणी वडिलांसह थोरल्या मुलावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धाकट्या भावाने तक्रार दिली आहे.

ठळक मुद्देबनावट मुखत्यारपत्र केल्याप्रकरणी वडील, मुलावर गुन्हाधाकट्या भावाची तक्रार : घरगुती मालमत्तेवरून वाद

सातारा : बनावट मुखत्यारपत्र तयार करून सातबाऱ्यावर नोंद केल्याप्रकरणी वडिलांसह थोरल्या मुलावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धाकट्या भावाने तक्रार दिली आहे.मुलगा किशोर पांडुरंग सारडा, वडील पांडुरंग नारायण सारडा (रा. शनिवार पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आजोबा नारायणदास शिवनाथ सारडा यांच्या इच्छापत्रानुसार मृत्यूनंतर त्यांच्या नावावर असलेली मिळकत धाकटा भाऊ मुकेश पांडुरंग सारडा (रा. भोपाळ, मध्यप्रदेश) यांच्या नावावर करण्यात आली होती.

मात्र, थोरला भाऊ किशोर आणि वडील पांडुरंग सारडा यांनी संगनमत करून मुकेश सारडा यांच्या नावाचे बनावट मुखत्यारपत्र तयार केले. त्यावर मुकेश यांच्या खोट्या सह्या केल्या. त्यानंतर न्यायालयात कोर्टाची दिशाभूल करून निकालाचा वापर केला.

सातबाऱ्यावर मुकेश सारडा यांच्या नावाची नोंद कमी करून त्यावर पांडुरंग सारडांनी स्वत:च्या नावाची नोंद केली. हा प्रकार समोर आल्यानंतर धाकटा भाऊ मुकेश सारडा यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

त्यांच्या तक्रारीवरून कलम ४७१ (खोटा दस्ताऐवज तयार करून वापरणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक ढेकळे हे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीSatara areaसातारा परिसर