सातारा : माण तालुक्यातील दानवलेवाडी येथे शेताच्या बांधावर गवत काढत असताना विद्युत खांबावरील आर्थिंग तारेचा शॉक लागल्याने एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. बाबूराव बंडू शिंदे (वय ६०, रा. दानवलेवाडी, ता. माण, जि. सातारा) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून, ही घटना दि. १८ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, बाबूराव शिंदे हे दानवलेवाडी येथील मावला शिवारात शेतातील बांधावर गवत काढत होते. यावेळी विद्युत खांबाच्या आर्थिंग तारेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची खबर मालोजी एकनाथ शिंदे (वय ४५, रा. दानवलेवाडी) यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर त्याची नोंद करण्यात आली. अधिक तपास सहाय्यक फौजदार एम. जे. राऊत करत आहेत.
दानवलेवाडीत विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:26 IST