शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊनमध्ये शेतरस्ते पुन्हा प्रकटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:48 IST

चाफळ : नानेगाव खुर्द (ता. पाटण) गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत लाॅकडाऊन काळातील वेळ सत्कारणी लावला आहे. गावात लोकसहभागातून शेतरस्ते ...

चाफळ : नानेगाव खुर्द (ता. पाटण) गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत लाॅकडाऊन काळातील वेळ सत्कारणी लावला आहे. गावात लोकसहभागातून शेतरस्ते तयार करण्याचे काम गुढीपाडव्यापासून सुरु केले आहे. ‘गाव ते शेत पोहोच रस्ता’ ही योजना स्वत:च तयार करत ती यशस्वीपणे राबवली आहे.

सध्या शेतरस्ते तयार होत असल्याने शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत थेट वाहन जाण्यास मदत झाली आहे. एकंदरीतच शेतापर्यंतचे रस्ते खुले झाल्याने येथील शेतकऱ्यांना आधुनिक शेती करणे फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

नानेगाव खुर्द येथे शेतरस्ते गेली कित्येक वर्षे बंद होते. पावसाळा असो की उन्हाळा हे रस्ते खुले केले जात नव्हते. त्यामुळे शेतापर्यंत वाहन जाऊ शकत नव्हते. साहजिकच शेतीची प्रगती होत नव्हती. अशा परिस्थितीत मग करायचे तरी काय? असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना सतावत होता. यावर रामबाण उपाय शोधत येथील काही शेतकऱ्यांनी पुढाकार घेत गावस्तरावर मोजके शेतकरी जमले. कोरोनाचे नियम पाळत बैठक घेतली. या बैठकीत गावातील प्रत्येक शेतापर्यंत रस्ते तयार करण्याची संकल्पना रुजवली गेली व ‘गाव ते शेत पोहोच रस्ता’ ही योजना शेतकऱ्यांनी तयार करुन ती यशस्वीपणे राबवलीही.

प्रत्येकाच्या शेतीपर्यंत पोहोच रस्ता हवा तरच शेतीची मशागत व इतर कामे व्यवस्थित व वेळेवर पार पडतील. रस्ते नसल्याने होणारी परवड पाहून लोकांनी सहकार्याची भूमिका पार पाडत सर्वानुमते गावातील सर्व शेतीला पोहोचतील, असे सर्व रस्ते खुले करण्याचा निर्णय गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर घेण्यात आला. त्या दिवसापासूनच सर्व रस्ते खुले करण्यास सुरुवात केली. यामुळे शेतीची मशागत, शेणखत देणे, पेरणी इत्यादी कामे वेळीच आणि सुलभतेने होणार आहेत.

चौकट :

आधुनिक शेतीचं स्वप्न सत्यात उतरणार

चाफळपासून सहा किलोमीटरवर उत्तरमांड धरणाजवळ नाणेगाव खुर्द आहे. शिक्षकांचे गाव म्हणून परिचित असणाऱ्या या गावात साधारणत: १०० हेक्टर शेतजमिनीचे क्षेत्र आहे. या गावातील प्रत्येकाच्या शेतजमिनीपर्यंत जाण्यासाठी रस्ते नव्हते. पूर्वीचे हवेदावे बाजूला ठेवत येथील शेतकऱ्यांनी स्वत:च योजना तयार करत यशस्वीपणे राबवली. त्यामुळे आधुनिक शेतीचे स्वप्न सत्यात उतरण्यास मदत झाली आहे. व लाॅकडाऊन काळातील वेळेचा सदुपयोगही झाला आहे.

फोटो हणमंत यादव यांनी मंगळवारी २७ तारखेला पाठविला आहे.