शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊनमध्ये शेतरस्ते पुन्हा प्रकटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:32 IST

चाफळ : नानेगाव खुर्द ता. पाटण गावातील शेतकऱ्यांनी एकत्रीत येत लाॅकडाऊन काळातील वेळ सतकारणी लावला आहे. लोकसहभागातून शेतरस्ते तयार ...

चाफळ : नानेगाव खुर्द ता. पाटण गावातील शेतकऱ्यांनी एकत्रीत येत लाॅकडाऊन काळातील वेळ सतकारणी लावला आहे. लोकसहभागातून शेतरस्ते तयार करण्याचे काम गुढीपाडव्यापासून सुरु केले आहे. ‘गांव ते शेत पोहोच रस्ता’ ही योजना स्वत:च तयार करत ती यशस्वीपणे राबवली आहे.

सध्या शेत रस्ते तयार होत असल्याने शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत थेट वाहन जाण्यास मदत झाली आहे. एकंदरीतच शेतापर्यंतचे

रस्ते खुले झाल्याने येथील शेतकऱ्यांना आधुनिक शेती करणे फायद्याचे ठरणार

आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

नानेगाव खुर्द येथे शेतरस्ते गेली कित्येक वर्षे बंद होते. पावसाळा असो की उन्हाळा हे रस्ते खुले केले जात नव्हते. परिणामी शेतापर्यंत वाहन जाऊ शकत नव्हते. साहजिकच शेतीची प्रगती होत नव्हती. अशा परिस्थितीत मग

करायचे तरी काय ? असा प्रश्न येथील शेतकरी बांधवांना सतावत होता. यावर

रामबाण उपाय शोधत येथील काही शेतकऱ्यांनी पुढाकार घेत गावस्तरावर मोजके

शेतकरी जमले. कोरोनाचे नियम पाळत बैठक घेतली. या बैठकीत गावातील प्रत्येक शेतापर्यंत रस्ते तयार करण्याची संकल्पना रुजली गेली. व ‘गाव ते शेत पोहोच रस्ता’ हि योजना ताच शेतकऱ्यांनी तयार करुन ती यशस्वीपणे राबवलीही.

प्रत्येकाच्या शेतीपर्यंत पोहच रस्ता हवा तरच शेतीची मशागत व इतर कामे व्यवस्थीत व वेळेवर पार पडतील. रस्ते नसल्याने होणारी परवड पाहून लोकांनी सहकार्याची भूमिका पार पाडत सर्वानूमते गावातील सर्व शेतीला पोहचतील असे सर्व रस्ते खुले करण्याचा निर्णय गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर घेण्यात आला. त्या दिवसापासूनच सर्व रस्ते खुले करण्यास सुरुवात केली. यामुळे शेतीची मशागत, शेणखते देणे, पेरणी इत्यादी कामे वेळीच आणि सुलभतेने होणार आहेत.

चौकट :

आधुनिक शेतीचं स्वप्न सत्यात उतरणार

चाफळपासून सहा किलो मीटरवर उत्तरमांड धरणाजवळ नाणेगांव खुर्द आहे. शिक्षकांचे गाव म्हणून परिचीत असणाऱ्या या गावात साधारत: १०० हेक्टर शेतजमिनीचे क्षेत्र आहे. या गावातील प्रत्येकाच्या शेत जमिनीपर्यंत जाण्यासाठी रस्ते नव्हते. पूर्वीचे हवेदावे बाजुला ठेवत येथील शेतकऱ्यांनी स्वत:च योजना तयार करत यशस्वीपणे राबवली. त्यामुळे आधुनिक शेतीचे स्वप्न सत्यात उतरण्यास मदत झाली आहे. व लाँकडाऊन काळातील वेळेचा सदोपयोगही झाला आहे.

फोटो हणमंत यादव यांनी २९ तारखेला मेल केला आहे.