सातारा : आई-वडिलांचा मृत्यू झालेल्या बालकांना मदतीची घोषणा सरकारने केली आहे. मात्र, आपले एकमेव अपत्य गमावलेल्या पालकांवर देखील दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशा पालकांना मदत कोण करणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.
सातारा जिल्ह्यात कोविडची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जवळपास प्रत्येक घरात किमान एक व्यक्ती तरी बाधित निघाल्याने प्रत्येकालाच आता कोविडची धास्ती बसली आहे. कोरोनामुळे ज्या बालकांचे आईवडील मृत्यू पावले अशा बालकांना शासनाने मदतीची घोषणा केली. मात्र, कोरोनामुळे अनेक आईवडिलांना आपला एकमेव मुलगा किंवा मुलगी गमवावी लागली आहे. अनेकांचा एकमेव आधार कोरोनाने हिरावून नेला आहे. त्यामुळे आता त्यांच्यासमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. यामुळे सरकारने अशा पालकांना देखील मदत करायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चौकट :
ज्येष्ठांचे प्रश्न वेगळेच !
अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या घरात केवळ एकटा कमावणारा त्यांचा मुलगा होता. त्यांच्या नोकरी व्यवसायावरच घरातील उदरनिर्वाह चालत होता. मात्र, तरुणाने अशा ज्येष्ठ पालकांचा एकमेव आधार हिरावून नेल्याने त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे कर्ज, घरभाडे, अशा प्रकारचे विविध प्रश्न त्यांच्यासमोर आहेतच. घरातील कमावती व्यक्ती गेल्याने स्वत: कष्टही करू शकत नाहीत आणि मदतही मागू शकत नाहीत अशी अवस्था त्यांची झाली आहे.
पॉइंटर -
कोरोनाचे एकूण रुग्ण : १७४५९०
बरे झालेले रुग्ण : १५५२५८
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण : १५४६७
एकूण मृत्यू : ३८६४
(ही आकडेवारी सहापर्यंत मिळेल)
कोट :
अशा पालकांना अर्थसाहाय्याची गरज
म्हातारपणाची काठी म्हणून आईवडील आपल्या मुलांकडे बघतात. आर्थिक परिस्थिती बरी असलेली कुटुंबे या संकटातूनही तरून निघू शकतात. पण ज्या घरात मुलगाच कमावणारा आहे, त्या कुटुंबातील ज्येष्ठांसाठी शासनस्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे. कोरोना ही एक आपत्ती असून यात कमावते पाल्य गमावलेल्या आईवडिलांना मदत द्यायला हवी.
- रेणू येळगावकर, एक कोशिष टीम, सातारा
स्टार : ७८३