शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

फलटणमध्ये ८० जणांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: August 15, 2014 00:27 IST

धनगर समाज आंदोलन : एसटीची तोडफोड; प्रवाशांवर ही केली दगडफेक, तीन जखमी

फलटण : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी फलटण तालुकाकृती आरक्षण समितीच्या वतीने फलटण बंद पाळण्याबरोबरच चक्का जाम व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागून बसस्थानकात घुसून ११ बसेसची व कंट्रोल केबिनची मोडतोड करण्यात आली. प्रवाशांवर दगडफेक करण्यात आल्याने तीनजण किरकोळ जखमी झाले. या घटनेनतंतर पोलिसठाण्यात दोन विद्यामान जिल्हा परिषद सदस्यांसह ८० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेश करून त्यांना आरक्षण द्यावे, या मागणीसाठी धनगर समाजाचे आंदोलन सुरू असून, गुरुवारी फलटण बंद ठेवण्याबरोबरच येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकामध्ये चक्का जाम आंदोलन व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. हजारोंच्या संख्येने धनगरबांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. रॅलीद्वारे आरक्षणाची मागणी करीत नाना पाटील चौकात जमा झाले. व चारही बाजूंचे रस्ते अडविण्यात आले.राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष बजरंग गावडे म्हणाले, ‘सरकारने केलेली घोषणा फसवी आहे. तिसरी सूची आम्हाला मान्य नाही. आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये थेट आरक्षण द्या. आतापर्यंत आघाडी शासनाने वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले असून, आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा इशारा यावेळी गावडे यांनी दिला.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सुभाष सोनवलकर, बजरंग खटके, खंडेराव सरक, संतोष ठोंबरे, दादासाहेब चोरमले, हणमंतराव सरक, तुकाराम शिंदे, महेंद्र बेडके आदींची भाषणे झाली.यावेळी स्वराज उद्योग समूहाचे प्रमुख रणजितसिंह नाईक-निंबाळकर, स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे, विजय बोरावडे, उपनगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, नगरसेवक अनुप शहा आदींनी घटनास्थळी येऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. (प्रतिनिधी)हिंसक आंदोलनामुळे नाराजीक्रांतिसिंह नाना पाटील चौकात रस्ता रोको व चक्का जाम आंदोलन चालू असताना आंदोलकांनी अचानक जवळील फलटण एसटी बसस्थानकात घुसून सहा एसटीच्या काचा फोडून व आगारातील कंट्रोल केबिनची नासधूस केली. त्याचबरोबर प्रवाशांवरही दगडफेक करण्यात आल्याने दोन शालेय विद्यार्थिनी व एक महिला जखमी झाली. यामुळे एसटी आगारात पळापळ झाली. लहान मुले, महिला विद्यार्थिनी खूप घाबरून सैरावैरा धावत होत्या. यावेळी आगाराबाहेरील रिक्षाचालक व पत्रकारांनी त्यांना एका कोपऱ्यात बसवून त्यांना सरंक्षण दिले. हिंसक आंदोलनाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.खंडाळ्यात महामार्ग रोखलाखंडाळा : धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे म्हणून खंडाळा तालुका धनगर समाजाच्या वतीने खंडाळा येथे रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, खंडाळ्यातील शिवाजी चौकापासून मोर्चास प्रारंभ झाला. येळकोट येळकोट जय मल्हार, आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे, अशी घोषणाबाजी अन् मेंढरांसह समाजबांधव मुख्य रस्त्याने पुणे-बंगळूर महामार्गावर आले. आणि रस्त्यावर ठिय्या मांडून सुमारे पाऊणतास महामार्ग रोखून धरला. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंला सुमारे एक ते दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. खंडाळ्याचे तहसीलदार शिवाजीराव तळपे, यांना खंडाळा तालुका धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके, टी. आर. गारळे, तालुका पंचायत समितीचे सदस्य रमेश धायगुडे, शिवाजीराव शेळके, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रदीप माने समाजबांधव सहभागी झाले होते.काशीळमध्ये मोर्चा...काशीळ : काशीळ, ता. सातारा येथे धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने गुरुवारी सकाळी १०.३० महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी काशीळसह परिसरातील धनगर समाजाच्या महिला व पुरुषांनी सुमारे अर्धा तास महामार्ग रोखून धरला. मोर्चामध्ये महिला तसेच मेंढरांची संख्या लक्षणीय होती. कपाळी भंडारा, ‘जागा हो धनगरा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे,’ ‘आमच्या समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा अनेक घोषणा देत सकाळी ९ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा दरम्यान, अनुचित प्रकार घडू नये, याकरिता कृती समितीचे कार्यकर्ते आंदोलनकर्त्यांना आंदोलन शांततेत करा, अशा सूचना करीत होते.पाटणमध्ये १९ जणांवर कारवाईपाटण : पाटणमध्ये धनगर समाज संघटनेच्या वतीने कराड-चिपळूण रस्त्यावरील नवीन बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको केल्याप्रकरणी पाटण पोलिसांनी १९ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.सकाळी ११ वाजता धनगर समाजाचे कार्यकर्ते पाटण नवीन बसस्थानक परिसरात गोळा झाले. त्यांनी आरक्षण मिळावे, या घोषणा देत आरक्षणाला विरोध करणाऱ्या मंत्र्याचा निषेध केला. त्यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून तासभर वाहतूक ठप्प केली. वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना बऱ्यांच अडणींना सामोरे जावे लागले. याप्रकरणी समाजाचे तालुकाध्यक्ष रामचंद्र झोरे, राजेंद्र ऐर, लक्ष्मण झोरे, पांडुरंग झोरे, प्रकाश झोरे, धोंडिराम ताटे, जगन्नाथ शेळके, रघुनाथ दंडिले, भागोजी शेळके, पांडुरंग बावधने, रामचंद्र शेळके, लक्ष्मण शेळके आदी १९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.कऱ्हाडात १९ कार्यकर्ते ताब्यात मलकापूर : आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने गुरुवारी राज्यभर रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले होते. त्यानुसार कऱ्हाडातही समाजबांधवांनी रास्ता रोको केला. पोलिसांनी १९ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. धनगर समाजाच्या वतीने सध्या ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी समाजबांधव रस्त्यावर उतरले आहेत. याचाच एक भाग म्हणून गुरुवारी रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला होता. कऱ्हाडातही समाज बांधवांच्या वतीने महामार्गावर रास्ता रोको करण्यात येणार होता. मात्र, पोलिसांनी महामार्गावर रास्ता रोको करण्यास परवानगी नाकारली. त्यानंतर समाजबांधवांनी शहरातील कोल्हापूर नाक्यावर महात्मा गांधीजींच्या पुतळ्यानजीक वाहने अडवून धरली. त्यामुळे याठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. काही वेळातच पोलिसांनी कार्यकर्त्यांना रस्त्यातून बाजूला घेतले. तसेच १९ जणांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणले. अहवाल लवकर देऊलिंगायत संघर्ष समितीच्या मागणीनुसारच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य मंत्रिमंडळात ही समिती नेमली आहे़ ही समिती अहवाल नेमक्या किती दिवसात देईल, हे सांगता येणार नाही़; पण लवकर देऊ,’ असेही मंत्री सोपल पत्रकारांशी बोलताना म्हणाले.