शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात बनावट नोटा बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ५६ लाख ४२ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 13:36 IST

साताऱ्यात एका अपार्टमेंटमध्ये चलनातील पाचशे व दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा बनवून त्या बाजारपेठमध्ये चालविणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले.

सातारा : साताऱ्यात एका अपार्टमेंटमध्ये चलनातील पाचशे व दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा बनवून त्या बाजारपेठमध्ये चालविणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्यांच्याकडून ५६ लाख ४२ हजार रुपयांच्या बनावट नोटा व १ लाख ३३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गणेश भोंडे (वय २५, रा. मोळाचा ओढा, सातारा), अनिकेत प्रमोद यादव (२२, रा. नवीन एमआयडीसी), अमोल अर्जुन शिंदे (२४, रा. गडकर आळी), सुनील देसू राठोड (२७, रा. मतकर कॉलनी), अमेल राजेंद्र बेलकर (२३, रा. पेंडसेनगर, मोळाचा ओढा) व राहुल अर्जुन पवार (२८, रा. शाहूपुरी) अशी आरोपींची नावे आहेत.याबाबत माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या पथकाने कोटेश्वर मंदिर परिसरात दुचाकीवर फिरून पाचशे व दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा चालविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाचशे रुपयांच्या २१ व दोन हजार रुपयांच्या ७ नोटा जप्त केल्या. अनिकेत यादव व अमोल शिंदे या दोघांनी या नोटा गणेश भोंडवे याने बाजारात चालविण्यासाठी दिल्याची कबुली दिली. त्यानंतर गणेश भोंडवे याच्या शाहूपुरीतील राहत्या घराची झडती घेतली असता दोन हजार रुपयांच्या १ हजार ३१५ नोटा व एका बाजूस महात्मा गांधींचा फोटो असलेली बाजू छापलेली व दुसरी बाजू कोरी असलेली ए-४ आकारचे ४९७ कागदं मिळून आले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता बनावट नोटा त्याला सुनील राठोड, अमेय राजेंद्र बेलकर, राहुल पवार यांनी बाजारात चालविण्याकरिता दिल्या आहेत. त्यानंतर या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २६ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा व २९ लाख ८८ हजार रुपयांच्या अर्धवट तयार केलेल्या नोटा असा एकूण ५६ हजार ४२ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा व १ लाख ३३ हजार ५०० रुपये किमतीचे वाहने व मोबाईल हँडसेट जप्त केले. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.