शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

दुसर्‍या हप्त्याबाबत कारखानदारी चिडीचूप

By admin | Updated: June 16, 2014 12:24 IST

केंद्र शासनाचे आदेश पाळून आम्ही उसाला दर दिला असून, 'भविष्यात दुसरा हप्ता हा शब्दच विसरा,' अशीच भूमिका जिल्ह्यातील जवळपास सर्वच कारखानदारांनी जाहीर केली आहे.

 
संजय कदम■ वाठार स्टेशन 
उत्पादन खर्चावर आधारभूत किमती (एफआरपी) प्रमाणे केंद्र शासनाचे आदेश पाळून आम्ही उसाला दर दिला असून, 'भविष्यात दुसरा हप्ता हा शब्दच विसरा,' अशीच भूमिका जिल्ह्यातील जवळपास सर्वच कारखानदारांनी जाहीर केली आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. 
केंद्र शासनाने ९.३0 टक्के साखर उतार्‍यासाठी २,१00 रुपये व पुढील प्रत्येक एक टक्क्यासाठी २२१ रुपये 'एफआरपी' जाहीर केली. त्यापेक्षा कमी दर देणार्‍यांवर कारवाई करण्याचेही संकेत दिले.
चालू गाळप हंगाम २0१३-१४ मध्ये उसाला किमान तीन हजार दर मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा जिल्ह्याला आंदोलनाचा केंद्रबिंदू केले. या दरम्यान, हिंसक आंदोलने झाली. शेतकर्‍यांनीही यास मोठा प्रतिसाद दिला; परंतु हे आंदोलन पद्धतशीरपणे मोडीत काढण्यात शासन व कारखानदारांना यश मिळाले. आणि उसाला दरही अपेक्षापेक्षा कमी मिळाला, यामुळे चालू हंगामात ऊसदर १,८00 ते २,२५0 रुपये याच दरम्यान स्थिर झाला.
तीन हजारांची अपेक्षा केलेल्या शेतकर्‍याला २,२00 रुपये देणेही मुश्किल असल्याची भूमिका जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी व्यक्त केली असून कारखानदारांच्या या भूमिकेबाबत राज्याचे सह साखर संचालक शेळके यांनीही दुजोरा देत साखरेच्या किमतीबाबत स्थिरता नसल्याने कारखानदारांना शेतकर्‍यांच्या अपेक्षा पूर्ण करणे अवघड असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता तीन हजारांची मागणी असणार्‍या शेतकरी संघटनेला कितपत प्रतिसाद मिळणार? हा प्रश्नच आहे.
जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे कार्यक्षेत्र असलेल्या किसन वीर कारखान्याने चालू हंगामात २,१२२ चा पहिला हप्ता जाहीर केला. यामधील १५ मार्च २0१४ पासून गळीत केलेल्या उसाला अद्याप पहिला हप्ताही मिळाला नसल्याने कारखान्याबाबत तक्रारही दाखल झाली आहे. तसेच ज्या ऊस उत्पादकांनी सेवा सोसायटींची कज्रे बँकेतून घेतली, याच लोकांची जेवढी सोसायटी आहे तेवढीच जमा करण्याचे काम या कारखान्याने केले आहे. ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसांत गाळप केलेल्या उसाचा पहिला हप्ता कारखान्याने देणे बंधनकारक असतानाही किसन वीर बाबत अद्याप साखर संचालकही मौन बाळगून आहेत. याबाबत 'लोकमत'शी बोलताना किसन वीरचे कार्यकारी संचालक वाबळे म्हणाले, 'बँकेकडूनच ऊस बिल रक्कम देण्याबाबत दिरंगाई होत असल्याने ऊस उत्पादकांची देय रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाईल.
 
२0१३-१४ मध्ये जिल्ह्यातील कारखान्यांचा दिलेला दर
अक्र.कारखाना           पहिला हप्ता
जरंडेश्‍वर२२३४
बाळासाहेब देसाई पाटण२२५0
सह्याद्री२२00
कृष्णा२२२१
साखरवाडी१८00+१00=१९00
किसन वीर२१२२
प्रतापगड२१२२
रयत२२५0
अजिंक्यतारा२२१0
१0श्रीराम-फलटण२000
११जयवंत शुगर२२१५
---------------
चालू हंगामात केंद्र शासनाच्या एफआरपीप्रमाणे आमच्या कारखान्याने तोडणी वाहतूकवजा करून १,८00 रुपयांचा पहिला हप्ता जमा केला आहे. कारखान्याची एफआरपी १,९00 रुपयेच असल्याने उर्वरित १00 रुपये कारखाना शेतकर्‍यांना देणार आहे.
- प्रल्हादराव साळुंखे-पाटील,चेअरमन, न्यू फलटण शुगर, साखरवाडी
---------------
सद्य:स्थितीत साखर कारखान्यांना शेतकर्‍यांच्या अपेक्षा पूर्ण करणे अवघड बाब असून, सध्या साखरेनुसार ऊसदर वाढवण्याची मागणी चुकीची आहे. सहा महिन्यांपूर्वी २,२00 ते २,४00 हा साखरेचा दर होता. या दराने बहुतांशी कारखान्यांची साखर विक्री केली, त्यामुळे सध्या कारखान्याकडे साखर विक्री करायला साखरच नाही. याशिवाय ज्या बँकाकडून वेळेत पैसे कारखान्यांना मिळणे गरजेचे होते, याबाबत बँका दिरंगाई करीत आहेत.
- के.एम.शेळके, सहसंचालक साखर संकुल, पुणे