सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर वाहनांचा वेगही जीवघेणा झाला आहे. बहुतांशी अपघात हे सुसाट वेगाने होत असले तरी महामार्गाच्या साईडपट्ट्या खचल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. शिवराज पेट्रोलपंप ते अजंठा चौकापर्यंत महामार्गाच्या साईडपट्ट्या खचल्या आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.रात्रीच्या सुमारास वाहन चालविताना थोडी नजर हटली तरी अपघात झालाच म्हणून समजा, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. शिवराज पेट्रोल पंपापासून अजंठा चौकापर्यंत तीव्र उतार आहे. या उतारावरील साईडपट्ट्या खचल्या आहेत. त्यामुळे अचानक अनेक वाहने कलंडत आहेत. महामार्गाच्या कडेला रिफ्लॅक्टर नाहीत. वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. गेल्या तीन महिन्यांत या चौकात वाहन कलंडून सात अपघात झाले आहेत. त्यामध्ये गंभीर अपघात म्हणजे कंटेनर कारवर कोसळला होता. दुसरी घटना त्याच ठिकाणी एक ट्रक साईडपट्टीवरून नाल्यात उलटला होता. अशा प्रकारे वारंवार अपघात होत आहेत. मात्र, प्रशासनाचे अद्याप याकडे लक्ष नाही. महामार्गावरून सुसाटपणे धावणारी वाहने इतरांच्या अंगावर शहारे आणतात. त्यातच एखाद्या पादचाऱ्याला अथवा वाहनांना ठोकरल्यानंतर ही वाहने तेथे तत्काळ न थांबता पुढे निघून जात आहेत. बॉम्बे रेस्टॉरंट चौक, अजंठा चौक, लिंब खिंड ही ठिकाणे अत्यंत धोकादायक बनली आहेत. (प्रतिनिधी)वाळू रस्त्यावररात्रीच्या सुमारास अवैध वाळूउपसा करणाऱ्या ट्रॉली महामार्गावरून जात असल्याने रस्त्यावर छोटे-छोटे वाळूचे कण पडलेले आहेत. त्यामुळे वाहने घसरून अपघात होत आहेत. शिवराज पेट्रोलपंप ते अजंठा चौक या दरम्यान नेहमी रहदारी असते. या परिसरामध्ये शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामुळे हा टापू खरंतर सुरक्षित पाहिजे; परंतु केवळ तात्पुरती डागडुजी करून पुन्हा रस्ते जैथे होत असतात. साईडपट्टी आणि सेवा रस्त्याच्या उंचीमध्ये बराच फरक असल्यामुळे अपघात होत असतात, असे रस्ता बनविणाऱ्या अभियंत्यांचे म्हणणे आहे.
नजर हटते..दुर्घटना घडते !
By admin | Updated: November 28, 2014 00:12 IST