शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

पश्चिम भागात पावसाची उघडीप; कोयनेतील साठा झाला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:48 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची पूर्णपणे उघडीप असून, कोयना धरणातील साठ्यात घट होऊ लागली आहे, तर पूर्व भागात ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची पूर्णपणे उघडीप असून, कोयना धरणातील साठ्यात घट होऊ लागली आहे, तर पूर्व भागात काही ठिकाणी पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

जिल्ह्यात जून महिन्याच्या मध्यावर मुसळधार पाऊस झाला होता. विशेष करून पश्चिम भागात धुवाधार पाऊस झालेला. यामुळे पश्चिमेकडील प्रमुख धरणांत पाणीसाठा वेगाने वाढण्यास सुरुवात झाली होती, तर शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली. असे असतानाच गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पश्चिमसह पूर्व भागातील खरीप हंगामातील पेरणी खोळंबली आहे. धरणातही पाण्याची आवक कमी होताना दिसून येत आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर येथे पाऊस पडला नाही; पण जूनपासून कोयनानगरला ९२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला आतापर्यंत ११०४ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे, तर महाबळेश्वरला जूनपासून १२८७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

मंगळवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४१.७९ टीएमसी पाणीसाठा होता, तर ४७५० क्युसेक वेगाने पाणी आवक होत होती. धरणाच्या पायथा वीजगृहातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तरीही कोयना धरणातील पाणीसाठ्यात घट होत चालली आहे.

दरम्यान, सातारा शहराबरोबरच परिसरात ढगाळ वातावरणाबरोबर ऊनही पडत आहे. पूर्व भागात खरीप हंगामाची पेरणी अडखळत सुरू आहे. पेरणी पूर्ण होण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. त्यातच गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.