शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

कल्पकतेसह प्रयोगशीलतेने तरूणाने तांबड्या मातीत पिकवलं सोनं...!

By admin | Updated: January 2, 2017 23:14 IST

गोळेगाव : देशी भाजीपाला, स्ट्रॉबेरी अशा पिकांचे उत्पादन

वाई : ज्या दुर्गम भागात आजपर्यंत फक्त गहू, भात, नाचणी अशी पारंपरिक पिके घेतली जात होती़ त्या परिसरात जितेंद्र गोळे यांनी आधुनिक पद्धतीने शेतीमध्ये विदेशी भाजीपाला, देशी भाजीपाला, स्ट्रॉबेरी अशा प्रकारच्या पिकांचे उत्पादन घेऊन परिसरातील शेतकऱ्यांंपुढे आदर्श निर्माण केला आहे़ यामुळे जितेंद्र गोळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे़गोळेगाव वाई तालुक्यातील अतिदुर्गम भागात मोडते. पावसाचे अति प्रमाण व सधन शेतीच्या भावामुळे पश्चिम भागातील अनेक तरुण नोकरीसाठी मुंबई, पुणे व इतरत्र सऱ्हास जाताना दिसत आहेत़ जितेंद्र गोळे यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले, त्यानतंर हॉटेल मॅनेजमेंन्टचा कोर्स करून काही दिवस नोकरी केली. परंतु नोकरीत मन रमेना म्हणून शेतीमध्ये काहीतरी नवीन करायचं ठरविले. आपल्या गावातील शेतीत २०११ पासून नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केली़ त्यांची प्रयोगशील शेती पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी येत असतात़ परंतु गोळे यांच्या प्रयोगशीलतेची दखल घेत सेवागिरी ट्रस्टद्वारे पुसेगाव येथे झालेल्या कृषी प्रदर्शन २०१६ या ठिकाणी जिल्हा परिषद सातारा तर्फे देण्यात आलेल्या ‘श्री सेवागिरी शेतीनिष्ठ’ पुरस्कार २०१६ यामध्ये वाई तालुक्यातून जितेंद्र दिलीप गोळे (रा. गोळेगाव) यांना पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा, आमदार शशिकांत शिंदे, आ़ मोहनराव कदम, आ़ आनंदराव पाटील, डॉ़ सुरेश जाधव, जिल्हा परिषद कृषी सहायक डॉ. चांगदेव बागल यांच्या उपस्थित पुरस्कार प्रदान करण्यात आला़ वाईपासून २७ किलोमीटरवर क्षेत्र महाबळेश्वरच्या पायथ्याच्या दुर्गम भागात वसलेल्या गोळेगाव या खेड्यामध्ये २०११ या वर्षी गवतपड जमीन विकसित करून सुरुवातीस स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले़ त्याचबरोबर गेले दोन वर्षांपासून स्ट्रॉबेरी सोबत विदेशी भाजीपाला पिके घेण्यास सुरुवात केली़ त्यामध्ये ब्रोकली, चायनीज कोबी, आईसबर्ग, चेरी टोमॅटो, पार्सली, सेलेरी, लालकोबी, स्वीट कॉर्न अशा वेगवेगळ्या विदेशी पालेभाजी पिकांचे उत्पादन घेण्यात येत आहे़ त्याचबरोबर नेहमीच्या देशी भाजीपाल्याचे देखील उत्पादन घेत आहेत. यामध्ये लाल मुळा, सफेद मुळा, दुधी भोपळा, कारले, वांगी, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, फराशी अशा मुळवर्गीय व पालेभाज्या पिकांचे देखील उत्पादन घेतले जाते़ यामध्ये जितेंद्र गोळे यांना त्यांचे वडील दिलीप साहेबराव गोळे यांची प्रेरणा मिळाली़ तसेच यासाठी त्यांना वेळोवेळी महालक्ष्मी अ‍ॅग्रो सर्व्हिसेस वाई, प्रशांत पोळ व भरत देशमुख यांचे तसेच पंचायत समितीमधील कृषी अधिकारी ज्योत्स्रा बहिरट या सर्वांनी मोलाचे मार्गदर्शन केले़ (प्रतिनिधी)मी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करत आहे़ पश्चिम भागात नैसर्गिक वैविधता चांगली असल्याने कृषी पर्यटन करण्याचा मानस आहे़ यामुळे स्थानिकांना रोजगार ही उपलब्ध होईल़ युवकांनी नोकरीच्या मागे न लागता कोणत्याही क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करून व्यवसाय करावा़ - जितेंद्र गोळे, गोळेगाव