शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीची गटबाजी रोखण्याची परीक्षा

By admin | Updated: October 26, 2016 00:21 IST

निवडणुकीच्या तोंडावर धक्कातंत्र : शेखर गोरे यांच्या प्रवेशामुळे पक्षाला बळकटी

सचिन मंगरूळे -- म्हसवड  -माण तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष बलाढ्य होता व आहे; पण राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाची ताकद गटागटांत विभागली गेल्याने पक्षाला नेतृत्व उरले नसल्याने पक्षाची अवस्था सैन्य आहे, पण सेनापती नाही अशी झाली होती. पण आता माण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शेखर गोरेंच्या रूपाने सेनापती मिळाल्याने माणमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा गतवैभव मिळेल, अशी आशा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. दरम्यान, शेखर गोरे हे बुधवार, दि. २६ रोजी मुंबई येथे कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.माण तालुका वगळता संपूर्ण सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. परंतु माणमध्ये २००९ च्या विधानसभेनंतर पक्षाची अवस्था केविलवाणी होत गेली. त्याचे कारण अंतर्गत गटबाजी ठरली. तालुक्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार दिवंगत सदाशिवराव पोळ यांना शह देण्यासाठी पक्षातील झारीतील शुक्राचार्यांनी प्रत्येक निवडणुकीत डोके वर काढल्याने पक्ष बॅकफूटवर जात गेला. तात्यांचा शांत व संयमी स्वभावाचा फायदा गटबाजीने घेतला गेला. आपण कसेही वागलो तरी आपले कोणीही वाकडे करू शकत नाही, ही भावना वाढीस लागली अन् तालुक्यातील राष्ट्रवादीची अवस्था बुडत्या जहाजासारखी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरज होती आक्रमक सेनापतीची जो अंतर्गत गटबाजी रोखू शकतो. असा चेहरा गोरेंच्या रूपाने पक्षाला गवसला असून, त्यांच्या पुढे अनेक आवाहने असून, महिन्यात होत असलेल्या माण-खटाव मतदार संघातील सर्वाधिक मतदार संख्या असणारी म्हसवड नगरपरिषद, तालुक्याचे मुख्यालय असणारी दहिवडी नगरपंचायत, वडूज नगरपंचायत निवडणुकीत सत्ता हस्तगत करण्यासाठी यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.