शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जरी झाली छाननी... प्रचारात अनंत अडचणी !

By admin | Updated: November 3, 2016 23:54 IST

पक्षातीलच काहीजण अपक्ष राहिल्याने गोंधळ : अर्ज माघारीसाठी उमेदवारांचे नेत्यांकडे साकडे

वडूज : जिल्ह्यात वडूज नगरपंचायतीला विक्रमी अर्ज दाखल झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत छाननीचे कामकाज सुरू होते. २०८ अर्जांमध्ये ११२ वैध अर्ज असून, सर्वच पक्षांचे मिळून ५४ अर्ज वैध ठरले तर उर्वरित ५८ जण अपक्ष राहिले. त्यामुळे छाननी झाली तरी पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांना ‘घरचाच आहेर ’ होण्याची दाट शक्यता असल्याने प्रचार यंत्रणेत अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पक्षातीलच कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज राहिल्याने अपक्षांचे अर्ज माघारी घेण्यासाठी नेत्यांच्या घराचे उंबरठे झिजवून अर्ज माघारी घेण्यासाठी प्रसंगी साकडे घालावे लागत आहे. पक्षाच्या वतीने असलेले उमेदवार कंसात पक्ष व अपक्षांची नावे : प्रभाग क्रमांक १ मध्ये श्रीकांत काळे (राष्ट्रवादी), अमर फडतरे (काँग्रेस), राहुल काळे (अपक्ष), शहाजी गोडसे (अपक्ष). प्रभाग क्रमांक २ मध्ये वंदना तानाजी पवार (राष्ट्रवादी), साधना सचिन काळे (भाजपा), शंकुतला बबन काळे (रासप), मिनल मोहन काळे (शिवसेना), मंगल शरद काळे (काँग्रेस), चंपा अविनाश काळे (अपक्ष), नीलिमा शिवाजीराव काळे (अपक्ष), वनिता बापू ननावरे (अपक्ष), मनीषा मनोज बनकर (अपक्ष). प्रभाग क्रमांक ३ मध्ये रुक्मिणी सोमनाथ खुडे (भाजप), काजल अमोल वाघमारे (राष्ट्रवादी), कविता जितेंद्र तुपे (शिवसेना), दीपाली प्रतीक बडेकर (काँग्रेस), पद्मीनी बाबासाो खुडे (अपक्ष), मनीषा अविनाश खुडे (अपक्ष), रेश्मा संतोष दोरके (अपक्ष), कांताबाई अशोक बैले (अपक्ष), रेखा वसंत महापुरे (अपक्ष). प्रभाग क्रमांक ४ मध्ये सुवर्णा राजेंद्र चव्हाण (राष्ट्रवादी), मिनाज अमिन मुल्ला (भाजप), सुमन विलास कुंभार (काँग्रेस), संध्या संजय अंबिके (अपक्ष), जयश्री संजय कुंभार (अपक्ष), सविता प्रमोद कुंभार (अपक्ष), स्वाती मनोज कुंभार (अपक्ष). प्रभाग क्रमांक ५ मध्ये हणमंत शिवाजी खुडे (राष्ट्रवादी), सागर प्रकाश रायबोळे (भाजप), नीलेश सुरेश रायबोळे (शिवसेना) पिंटू ऊर्फप्रदीप मार्तंड खुडे (काँग्रेस). प्रभाग क्रमांक ६ मध्ये अशोक गाढवे (राष्ट्रवादी), अनिल माळी (भाजप), जैनुद्दीन ऊर्फमुन्ना मुल्ला (काँग्रेस), धनजंय काळे (अपक्ष), महेश खडके (अपक्ष), श्रीकांत तोडकर (अपक्ष), किरण नवगण (अपक्ष), दाउदखान मुल्ला (अपक्ष), मुसा मुल्ला (अपक्ष), अजयकुमार शेटे (अपक्ष), विजयकुमार शेटे (अपक्ष), विजय शेटे (अपक्ष). प्रभाग क्रमांक ७ मध्ये विजय काळे (राष्ट्रवादी), महेश गुरव (काँग्रेस), विशाल महामुनी (भाजप), सचिन काळे (अपक्ष), श्रीकांत बनसोडे (अपक्ष). प्रभाग क्रमांक ८ मध्ये रेखा प्रवीण जाधव (शिवसेना), सुजाता रणजित जाधव (राष्ट्रवादी), शुभांगी सोमनाथ जाधव (काँग्रेस), सुजाता अमित जाधव (अपक्ष), कमल अरुण यादव (अपक्ष), हेमलता सचिन यादव (अपक्ष), सुमन अंकुश शिंदे (अपक्ष). प्रभाग क्रमांक ९ मध्ये सुषमा दीपक बोडरे (भाजप), छाया शशिकांत पाटोळे (काँग्रेस), पुष्पलता बनाजी पाटोळे (अपक्ष), सिंधू बाळू पाटोळे (अपक्ष). प्रभाग क्रमांक १० मध्ये संजय खुस्पे (शिवसेना), अमोल गोडसे (काँग्रेस), अरविंद जाधव (राष्ट्रवादी), राजेंद्र जगताप (भाजप), विपुल गोडसे (अपक्ष). प्रभाग क्रमांक ११ मध्ये सुनील गोडसे (राष्ट्रवादी), अमर जाधव (भाजप), सचिन गोडसे (काँग्रेस) श्रीकांत काळे (अपक्ष), अर्चना चव्हाण (अपक्ष), अभय देशमुख (अपक्ष), वैभव शिंदे (अपक्ष). प्रभाग क्रमांक १२ मध्ये सुनीता राजू कुंभार (राष्ट्रवादी), वासंती किरण काळे (शिवसेना), क्रांती चंद्रकांत काटकर (काँग्रेस), पल्लवी दत्तात्रय सजगणे (अपक्ष). प्रभाग क्रमांक १३ मध्ये नीता विक्रम घाडगे (भाजप), सुनीता विनायक खाडे (राष्ट्रवादी), प्रतीक्षा संतोष भोसले (काँग्रेस), सुजाता संतोष इंगळे (अपक्ष), वनिता सुभाषचंद्र खाडे (अपक्ष), नीता प्रशांत गोडसे (अपक्ष), नलिनी अनिल गोडसे (अपक्ष), सुरेखा हणमंत गोडसे (अपक्ष), तयब्बा सज्जाद शेख (अपक्ष). प्रभाग क्रमांक १४ मध्ये वचन शहा (भाजप), नानासो गोडसे (राष्ट्रवादी), अशोक गोडसे (काँग्रेस), प्रकाश गोडसे (अपक्ष), सुनील गोडसे (अपक्ष). प्रभाग क्रमांक १५ मध्ये सोभा सचिन माळी (राष्ट्रवादी), रेखा राजेंद्र बनसोडे (शिवसेना) नंदा अभिजित बनसोडे (काँग्रेस). प्रभाग क्रमांक १६ मध्ये किशोरी अजित पाटील (भाजप), स्नेहल युवराज गोडसे (राष्ट्रवादी), सुनीता अर्जुन गोडसे (काँग्रेस), नीलम जयवंत गोडसे (अपक्ष), माधवी गणेश गोडसे (अपक्ष), मंगल अंकुश गोडसे (अपक्ष), रत्नमाला महेंद्र गोडसे (अपक्ष), रुपाली राहुल जमदाडे (अपक्ष), लता गणपत पवार (अपक्ष). प्रभाग क्रमांक १७ मध्ये बंडा ऊर्फ नामदेव गोडसे (राष्ट्रवादी), बाळासाहेब ऊर्फ यशवंत गोडसे (भाजप), दीपक गोडसे (काँग्रेस), नितीन गोडसे (अपक्ष), रावसाहेब गोडसे (अपक्ष), विजय गोडसे (अपक्ष), विशाल गोडसे (अपक्ष), संदीप गोडसे, (अपक्ष), गोविंदराव शिंदे (अपक्ष). (प्रतिनिधी) गोंधळलेल्या उमेदवारांचा प्रचारात सावध पवित्रा पक्षीय व अपक्ष तुल्यबळ उमेदवार रिंगणात असून, एकमेकांच्या विरोधात प्रचार राबविताना कोणताही कसूर सोडत नसल्याचे चर्चा दरम्यान आढळून येत आहे. तर पक्षातीलच उमेदवारी अर्ज अपक्ष राहिल्याने गोंधळलेल्या उमेदवारांना प्रचार करताना सावध पवित्रा घ्यावा लागत आहे. अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, पक्षाची उमेदवारी मिळालेले उमेदवार काहीकाळ सहकारी असणारे परंतु या कुरूक्षेत्रात प्रतिस्पर्धी म्हणून रिंगणात उतरलेल्यांना अर्ज ‘माघारी घ्या’ असे त्यांच्या गळी उतरविण्यासाठी नेतेमंडळींना साकडे घालत आहेत.