शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

प्रयत्न करूनही तिजोरी फुटलीच नाही... लोधवडेत धाडसी प्रयत्न : दमलेले दरोडेखोर पतसंस्थेत साहित्य टाकून पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:08 IST

दहिवडी : माण तालुक्यातील लोधवडे येथे रविवारी मध्यरात्री अज्ञातांनी सरस्वती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेवर धाडसी दरोड्याचा प्रयत्न केला.

दहिवडी : माण तालुक्यातील लोधवडे येथे रविवारी मध्यरात्री अज्ञातांनी सरस्वती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेवर धाडसी दरोड्याचा प्रयत्न केला. खूप प्रयत्न करूनही तिजोरी न फुटल्याने दमलेल्या दरोडेखोरांनी आणलेले साहित्य तिथेच टाकून पळ काढला. दरम्यान, या दरोड्याच्या तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, पतसंस्थेच्या मागील बाजूने श्वान फिरून जागेवरच घुटमळले.

लोधवडे येथे सरस्वती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आहे. ही पतसंस्था गावाच्या मध्यभागी असून, शेजारी सोसायटीचे कार्यालय आणि प्राथमिक मराठी शाळाही आहे. मुख्य रस्त्याकडे तोंड करून पतसंस्था कार्यालय आहे. तर याच इमारतीत पाठीमागे पतसंस्थेच्या दक्षिण बाजूला रेशनिंग दुकान आहे. रविवारी नेहमीप्रमाणे कामकाज संपल्यावर कर्मचाºयांनी सायंकाळी संस्था बंद केली.

सोमवारी सकाळी पाहिले असता रेशनिंग दुकानाचे दार उघडे असल्याचे काहीजणांना दिसले. त्यानंतर संस्थेच्या कर्मचाºयांना माहिती देण्यात आली. त्यांनी पाहिले असता संस्थेत चोरीचा प्रयत्न करण्याची घटना उघडकीस आली.चोरट्यांनी मध्यरात्री बारा वाजण्याच्यानंतर रेशनिंग दुकानाच्या बाजूने कटावणीने दार उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर रेशनिंग दुकानाचे दार लावून घेतले.

आतल्या दाराने पतसंस्थेत प्रवेश केला व संस्थेची तिजोरी फोडण्यासाठी त्यांनी लहान आणि एक मोठा असे दोन सिलिंडर आणले होते. त्यासाठी लागणारे सगळे साहित्य अतिशय गोपनीयरीत्या आत नेले. तिजोरी ठेवलेल्या ठिकाणी जात गॅस कटरच्या साह्याने तिजोरीवर काही ठिकाणी छेद घेण्यात आले. मात्र खूप प्रयत्न करूनसुद्धा तिजोरी फुटली नाही. अखेर दमलेल्या चोरट्यांनी बरोबर आणलेले साहित्य जागीच ठेवून पलायन केले. या घटनेची फिर्याद संस्थेचे व्यवस्थापक दाजीराम जगताप यांनी दिली आहे. याघटनेचा हवालदार तुपे हे तपास करीत आहेत .दरोड्यासाठीचे साहित्य दुचाकीवरूनया घटनेची माहिती दिल्यानंतर या ठिकाणी म्हसवड आणि दहिवडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर पोलिस उपअधीक्षक चोपडे, पोलिस अधिकारी प्रकाश इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी ठसे तज्ज्ञांच्या मदतीने काय मार्ग सापडतोय का पाहिले. श्वानाला घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंचा वास दिला. त्याद्वारे श्वान बाहेर येऊन काही ठिकाणी फिरले व जागेवरच घुटमळले. दरम्यान, चोरट्यांनी तिजोरी फोडण्यासाठी लागणारे साहित्य दुचाकीवरून आणलेले असावे, अशी चर्चा घटनास्थळी होती.