शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रजोनिवृत्तीनंतरही ‘ती’ आई होणार

By admin | Updated: July 2, 2015 00:23 IST

पन्नाशीतील मातृत्व : माउली टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे यश

सातारा : आई होण्याची तारुण्यात अपुरी राहिलेली इच्छा उतारवयात पूर्ण करून घेण्याची संधी येथील एका महिलेला मिळाली आहे. रजोनिवृत्तीनंतर चार वर्षांनी या महिलेला गर्भ राहिला असून, माउली टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे डॉ. रूपेश काटकर यांनी केलेल्या उपचारांना यश आले आहे.डॉ. काटकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. पूनम विजय शिंदे (नाव बदलले आहे) या लग्नानंतर २६ वर्षांत एकदाच डॉक्टरची पायरी चढल्या होत्या, तेही गर्भ राहत नाही याच कारणासाठी. या कारणासाठी उपचार घेऊन काय उपयोग, असे जुन्या काळातील सासू-सासरे त्यांना नेहमी म्हणत असत. त्यातच वयाच्या ४६ व्या वर्षी पूनम यांना रजोनिवृत्ती आली. टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान वापरून तारुण्यात अपत्यप्राप्ती होऊ शकते; पण पूनम यांना रजोनिवृत्तीही आली होती. त्यांचे वय ५० असताना त्यांच्यावर डॉ. काटकर यांनी उपचार सुरू केले. रजोनिवृत्तीनंतर गर्भाशयाचा आकार लहान होतो. त्यावर औषधोपचार करून गर्भाशय पूर्वस्थितीत आणण्यात त्यांनी आधी यश मिळविले. मासिक पाळी व्यवस्थित सुरू झाल्यानंतर जूनमध्ये टेस्ट ट्यूब तंंत्रज्ञान वापरण्यात आले. अधिक वयातही वंध्यत्वावर मात करून मातृत्व देणारी ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असून, मुंबईत जागतिक कीर्तीच्या मान्यवर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या अभ्यासाचा या महिलेवर उपचार करताना उपयोग झाल्याचे डॉ. काटकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)