शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कोठडीतून आरोपीचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 22:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत असणारा सराईत चोरटा चंद्रकांत ऊर्फ चंदर लक्ष्मण लोखंडे (वय ३१) हा स्वच्छतागृहातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. रविवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास घडलेल्या या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली असून, लोखंडेच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना झाली आहेत.दरम्यान, या प्रकरणात एका ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत असणारा सराईत चोरटा चंद्रकांत ऊर्फ चंदर लक्ष्मण लोखंडे (वय ३१) हा स्वच्छतागृहातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. रविवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास घडलेल्या या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली असून, लोखंडेच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना झाली आहेत.दरम्यान, या प्रकरणात एका पोलिसाचे निलंबन, तर इतर तिघांची वेतनवाढ रोखण्यात येणार असल्याची माहितीपोलीस अधीक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, चार दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने लोणंद (ता. खंडाळा) येथे दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीला पकडले होते. त्यावेळी त्यांच्याकडून मिरची पूडसह नॉयलॉन दोरी, मोबाईल, दोन दुचाकी जप्त केल्या होत्या. तसेच दरोड्याच्या तयारीत असणाºया चंद्रकांत उर्फ चंदर लक्ष्मण लोखंडे (वय ३१, रा. ढवळ, ता. फलटण. सध्या रा. शिरवळ, ता. खंडाळा) यालाही पकडले होते. त्यानंतर त्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली होती. सध्या तो सातारा शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत होता. रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्याला व अन्य एका संशयिताला पोलिस कोठडीत असणाºया स्वच्छतागृहात नेले होते. त्यावेळी चंद्रकांत लोखंडे स्वच्छतागृहाच्या पाठीमागील बाजूची लाकडी खिडकी मोडून व गज वाकवून पसार झाला.स्वच्छतागृहातून लोखंडे हा लवकर बाहेर येत नाही, म्हणून उपस्थित पोलिसांनी दरवाजा वाजविण्यास सुरुवात केली. पण आतून प्रतिसाद आला नाही. त्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडून पाहिले असता लोखंडे दिसून आला नाही. त्यामुळे पोलिसांची एकच पळापळ सुरू झाली. आसपास शोध घेतला पण तो आढळून आला नाही. त्यामुळे लोखंडे हा पळून गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सातारा शहर पोलिस ठाणे, शाहूपुरी ठाणे, सातारा तालुका ठाणे, बोरगाव पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेची पथके त्याच्या शोधासाठी रवाना झाली. याप्रकरणी हवालदार धनंजय धोंडीराम गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.