शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

गावकारभारी निवडण्यात साऱ्यांनाच उत्साह

By admin | Updated: August 4, 2015 23:16 IST

यांची निवडणूक ...आम्हाला तोटा !

सातारा : जिल्ह्यातील विविध ठिकाच्या ५५० ग्रामपंचायतींचे भवितव्य आज (मंगळवार) मशीनबंद झाले. यानिमित्तानं गावोगावचे राजकारण ढवळून निघाले होते. ही ग्रामपंचायत निवडणूक राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठेची बनली होती. साहजिकच गावोगावी जास्तीत जास्त मतदानासाठी कार्यकर्ते झटताना दिसले. इतर वेळी कुणाला उचलूही न लागणाऱ्यांनी आज चक्क वयोवृद्धांना उचलून घेऊन मतदान केंद्रावर पोहोचवलं. तेव्हा त्यांच्यात दडलेल्या समाजसेवकाचे दर्शन झाले. उन्हातून चालणाऱ्या एखाद्या पादचाऱ्याला कधी आपल्या गाडीवर बसवलं नसेल पण आज चक्क चारचाकी वाहने पाठवून शहरात असलेल्या मतदारांना गावाकडे घेऊन आले. तेव्हा त्यांच्यातील चिकाटी दिसली. अशा तऱ्हेने गावोगावी झाडून मतदान झाले. मतदानादिवशी काय-काय घडलं, याचं हे सचित्र दर्शन...खुर्चीखाली केळं अन् सफरचंद !खेड ग्रामपंचायत निवडणुकीचं वातावरण चांगलच तापलेलं पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणापर्यंत छुप्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी कार्यकर्ते विविध मार्ग अवलंबत होते. काहींनी पोलिंग बुथवर बसणाऱ्या एजंटांच्या खुर्चीखाली केळं अन् सफरचंद ठेवली होती. मतदार ओळखीचा दिसल्यानंतर त्याला हळूच एक सफरचंद देण्यात येत होतं. सफरचंद दिल्यानंतर नमस्कार करून त्याचे स्वागत केले जात होते. मात्र एका कार्यकर्त्याच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर सर्व फळे पोत्यात भरून एका घरात नेण्यात आली.यांची निवडणूक ...आम्हाला तोटा !खेड ग्रामपंचायतीमध्ये पोलिंग बूथच्या शंभर मीटर अंतरापर्यंत असणारी दुकाने पोलिसांनी बंद करायला लावली होती. मग त्यामध्ये किराणा मालापासून पानटपरीपर्यंत सर्वच दुकाने बंद होती. निवडणुकीमध्ये घोळका करून लोक चौका-चौकात उभी राहात असतात. त्यामुळे गप्पांच्या ओघामध्ये दुकानातून कोणी काहीही खरेदी करत असतं. हा एकच दिवस असा असतो की या दिवशी दुकानदारांचा आठवड्याचा व्यावसाय एका दिवसात होत असतो. मात्र, पोलिसांनी दुकाने बंद करायला लावल्यामुळे त्यांच्या व्यावसायावर परिणाम झाला. यांची होतेय निवडणूक अन् आम्हाला होतोय तोटा, अशी संतप्त प्रतिक्रिया एका दुकानदाराने पोलिसांसमोरच व्यक्त केली. ..तर भरपूर दान केलं असतं !एका मतदान केंद्रावर डोक्यावर पाटी घेऊन एक महिला आली होती. तिच्या पाटीमध्ये देव, देवीच्या मुर्त्या ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक कार्यकर्त्याजवळ जाऊन ती हात पुढे पसरून पैसे मागत होती. त्यावेळी तेथे असलेल्या एका कार्यकर्त्याने ‘तुझं जर मतदान असतं तर तुला भरपूर दान केलं असतं,’ असं मिश्किल वक्तव्य केलं. बाकीच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या बोलण्याला हसून दाद दिली. आदल्या रात्री मतदारांकडे ‘लक्ष्मी’ फिरली असावी, असं त्याच्या बोलण्यावरून उपस्थितांना जाणवले.