शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अभियंता अन् तलाठी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

By admin | Updated: February 7, 2017 23:02 IST

खंडाळा, फलटण येथे वेगवेगळी कारवाई; ना हरकत दाखला, सातबारा उताऱ्यासाठी लाचेची मागणी

शिरवळ/ फलटण : खंडाळा येथील बांधकाम शाखा अभियंता संजय अमृत सोनावणे याला सात हजारांची तर पिंपरद, ता. फलटण येथील तलाठी दीपक शिवाजी नलगे याला दीड हजाराची लाच घेताना मंगळवारी लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.घाटदरे, ता. खंडाळा येथील एका व्यक्तीला औद्योगिक कारणासाठी बिनशेती परवानगीसाठी लागणारा ना हरकत दाखला पाहिजे होता. यासाठी संबंधित व्यक्ती खंडाळा येथील बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता संजय सोनावणे (वय ४८, सध्या रा. साईनगरी अपार्टमेंट, शाहूनगर, गोडोली, सातारा मूळ रा. जवकडे शिम, ता. एरंडोल जि. जळगाव) याच्याकडे गेली. त्यावेळी सोनावणे याने त्यांच्याकडे आठ हजारांची मागणी केली. तडजोडीनंतर सात हजार रुपये देण्याचे ठरले. संबंधित तक्रारदाराने मंगळवारी लाचलुचपतच्या कार्यालयात जाऊन रितसर तक्रार नोंदविली. त्यानंतर लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी खंडाळा येथील पंचायत समितीच्या कार्यालयात सापळा रचून सोनावणेला सात हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.दरम्यान, दुसरी कारवाई फलटण येथे करण्यात आली. विहिरीची नोंद करून सातबारा उतारा देण्यासाठी संबंधित तक्रारदाराकडे पिंपरदचे तलाठी दीपक शिवाजी नलगे (वय ४७, रा. कोळकी, ता. फलटण) याने दोन हजार रुपयांची लाच मागितली. अखेर दीड हजारावर तडजोड झाल्यानंतर तक्रारदाराने सातारा येथील लाचलुचपत कार्यालयात येऊन तक्रार नोंदविली. त्यानंतर मंगळवारी दुपारी लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला. फलटण येथील राजाळे मंडलाधिकारी कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर दीपक नलगे याला दीड हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.ही कारवाई लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बयाजी कुरळे, पोलिस हवालदार आनंदराव सपकाळ, अजित कर्णे, प्रशांत ताटे, संभाजी काटकर यांनी केली. (प्रतिनिधी)