उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगाराची आवश्यकता: उदयनराजे भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 11:28 PM2019-04-04T23:28:56+5:302019-04-04T23:29:00+5:30
खंडाळा : ‘खंडाळा येथील उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगारासाठी प्राधान्य मिळाले पाहिजे. आजपर्यंत मी येथील भुमिपुत्रांसाठी लढा दिला. अजून कितीही खटले ...
खंडाळा : ‘खंडाळा येथील उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगारासाठी प्राधान्य मिळाले पाहिजे. आजपर्यंत मी येथील भुमिपुत्रांसाठी लढा दिला. अजून कितीही खटले माझ्यावर पडले तरी मी मागे हटणार नाही. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही,’ अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
खंडाळा येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे, प्रल्हाद खंडागळे, दत्ता गाढवे, युवराज गाढवे, नारायणराव पवार, पुंडलिकराव धुमाळ, पांडुरंग आवाडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर उपस्थित होते.
पारगाव येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन बकाजीराव पाटील यांच्या निवासस्थानी पंचक्रोशीतील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी बकाजीराव पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांचे भाषण झाले. यावेळी संजय पाटील, अजय धायगुडे, अमोल धुमाळ, भूषण शिंदे, जालिंदर पवार उपस्थित होते. खंडाळा येथे अॅड. शामराव गाढवे यांच्या निवासस्थानी भेट देऊन उदयनराजे भोसले यांनी प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी खंडाळ्याच्या नगराध्यक्षा लताताई नरुटे, सुप्रिया गुरव, वनिता संकपाळ, उज्ज्वला संकपाळ, भाऊसाहेब गाढवे, जावेद पठाण, शैलेश गाढवे, प्रशांत गाढवे, शिवाजी खंडागळे, उदयसिंह गाडवे, डॉ. शिवाजी गाढवे, पंकज खंडागळे उपस्थित होते.