शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

देवळीमुरा गावात बिबट्यासाठी कर्मचारी पिंजºयात,बंद घरात थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:10 IST

महाबळेश्वर : तालुक्यातील देवळीमुरा या गावात रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या थेट घरात शिरला.

ठळक मुद्देदेवळीमुरातील : सुरक्षित राहून उघडला दरवाजाघटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

महाबळेश्वर : तालुक्यातील देवळीमुरा या गावात रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या थेट घरात शिरला. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून घराला कडी लावल्याने बिबट्या घरातच कोंडून राहिला. मात्र, त्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाºयांनी स्वत:ला पिंजºयात कोंडून घेऊन बिबट्याला जंगलात पिटाळले.

या विचित्र घटनेची माहिती अशी की, देवळीमुरा गावातील एका घरात शिरलेल्या बिबट्याला ग्रामस्थांनी दाराला कडी लावून आत कोंडले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पाचारण केले. यानंतर पहाटे तीन वाजता बिबट्याला जंगलात सोडण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर तालुक्यातील देवळीमुरा गावात रामचंद्र धोंडिबा आखाडे हे कुटुंबीयांसह राहतात. रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना कुत्र्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. पाहणी केल्यानंतर त्यांना आपल्याच घरातील एका खोलीत चक्क बिबट्या आढळून आला.

याबाबतची माहिती मिळताच ग्रामस्थांनी सुरक्षेच्या दृष्टीने प्रसंगावधान राखत घराला बाहेरून कडी लावली व तातडीने याची माहिती वनविभागाला दिली.वनविभागाचे कर्मचारी पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ अधिकाºयांचे आदेश आल्यानंतर पहाटे तीन वाजता वनकर्मचाºयांनी पिंजºयात बसून घराला लावलेली कडी काढली. यानंतर बिबट्या जंगलाच्या दिशेने निघून गेला. दरम्यान, या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे.सुरक्षेसाठी रात्रगस्तग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागाकडून देवळीमुरा येथे रात्रगस्त घालण्यात येणार आहे. मात्र, ग्रामस्थ व शेतकºयांनीही सतर्क राहावे, रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, घरात शिरलेला बिबट्या खाद्याच्या शोधार्थ आला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.