शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
3
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
4
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
5
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
6
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
7
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
8
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
9
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
10
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
11
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
12
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
13
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
14
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
15
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
16
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
17
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
18
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
19
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
20
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष

आबांचा जोर... विरोधकांना मात्र घोर!

By admin | Updated: August 24, 2015 23:14 IST

लोणंद बाजार समिती : १७ जागांवर मोठ्या फरकाने विजय; काँग्रेसवर अंतर्मुख होण्याची वेळ

दशरथ ननावरे ल्ल खंडाळा आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने काँग्रेसप्रणित शेतकरी पॅनेलवर लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या फरकाने विजय मिळविला. खंडाळा तालुक्यात मकरंद पाटील यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा गजर झाला. त्यामुळे काँग्रेसला आता अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे. लोणंद बाजार समितीत राष्ट्रवादीच्या पॅनेलने १७ जागा जिंकत आपण तालुक्यात नंबर एक असल्याचे सिद्ध केले. आमदार मकरंद पाटील यांचे नेतृत्व व जनसंपर्क यामुळे राष्ट्रवादीची मोठी फळी निर्माण झाली आहे. त्याचबरोबर वाडी-वस्तीवर पोहोचलेली विकासकामे लोकांच्या मनात घर करून आहेत. त्यामुळेच ग्रामपंचायतीच्या प्रचंड यशानंतर बाजार समितीच्या विजयाचा तुराही राष्ट्रवादीने मानाने रोवला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील मतभेदानंतर आमदार पाटील यांनी ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील यांच्याशी पुन्हा सलगी करण्यात यश मिळविले. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या प्रमुखांची एकसंध ठेवून नाराजी दूर करण्यातही आघाडी घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचे काम समन्वयाने झाले. त्यामुळेच सोसायटी मतदारसंघ व ग्रामपंचायत मतदारसंघातील सर्व जागा मोठ्या फरकाने विजयी झाल्या. मापाडी व हमाल पंचायतीची जागाही राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विजयी झाली. व्यापारी मतदार संघावर कायम काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, यावेळी त्यातील एक जागा खेचून आणण्यात राष्ट्रवादीला यश आले. काँग्रेसचे राहुल नागर हे व्यापारी मतदारसंघातून वैयक्तिक प्रभावातून निवडून आले. ग्रामपंचायती पाठोपाठ बाजार समितीतही काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली आहे. ज्येष्ठ नेत्यांनी फिरवलेली पाठ आणि कार्यकर्त्यांची दिशाहीन कामगिरी यामुळे काँगेसला अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे. तर तालुका काँग्रेसला बळ देण्यासाठी सक्षम नेतृत्वाचीही गरज आहे. गाव पातळीवर कार्यकर्त्यांना पक्षाकडून बळ दिले जात नसल्याचा सूर काँग्रेसमधून चर्चिला जात आहे. याऊलट आमदार मकरंद पाटील हे प्रत्येक गावाच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात. याशिवाय माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील, सभापती रमेश धायगुडे, समन्वयचे अध्यक्ष शामराव गाढवे, हणमंतराव साळुंखे, राजेंद्र तांबे, रमेश शिंदे, राजेंद्र नेवसे, शिवाजीराव शेळके यासारखी मोठी फळी राष्ट्रवादीत जोमाने कार्यरत आहे.