शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
2
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
3
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
4
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
5
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
6
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
7
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
8
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
9
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
10
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
11
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
13
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
14
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
15
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
16
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
17
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
18
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
19
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
20
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार

मोहनराव कदमांच्या भेटीने कार्यकर्ते भावूक

By admin | Updated: November 15, 2016 00:26 IST

कवठेमहांकाळला बैठक : विधानपरिषद निवडणूक

अर्जुन कर्पे -- कवठेमहांकाळ -वेळ सायंकाळी साडेपाचची. कवठ्यात नगरपंचायतीचे वारे वाहू लागले असताना, जुन्या बसस्थानकावरून माणसांची ये-जा सुरू होती. काँग्रेसचे उमेदवारही दिवसभराचा प्रचार आटोपून काँग्रेस भवनात मतांची आकडेमोड करीत बसले होते. याचवेळी ज्येष्ठ नेते मोहनराव (दादा) कदम यांनी काँग्रेस भवनमध्ये अचानक प्रवेश केला आणि सगळेच अवाक् झाले. दादा आले आणि त्यावेळी बैठकीत रूपांतर कधी झाले, हे समजलेच नाही. बघता-बघता शेकडो कार्यकर्ते जमा झाले आणि दादांनी जुन्या आठवणींना उजाळा देण्यास सुरुवात केली. ‘हे बघा पोरांनो, मी राजकारणातील एक राजकीय मूर्तिकार म्हणून खूप मोठी भूमिका पार पाडली आहे. या राजकारणात अनेक आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, महापौर, सभापती, अध्यक्ष, राजकारणातील अनेक मातब्बर कार्यकर्ते, नेते घडविले आणि यात किती व कसा वेळ गेला समजलेच नाही. काम करीत राहिलो. खूप काम केले. काँग्रेस पक्षाने जी जी जबाबदारी आजवर दिली, ती इमानेइतबारे पार पाडली. पण राजकारणातील रंगमंचावर मात्र मी उपेक्षितच राहिलोय रे! उपेक्षित हे समजायला अख्खे आयुष्य वेचावे लागले रे...’, असे म्हणत दादा खूपच भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले आणि उपस्थित सर्वच शांत झाले.परत दादांनीच सर्वांना सावरत, ‘चालायचं राजकारणात’, म्हणत, ‘आपलं काम आहे जनतेची सेवा करायचं, ते करत राहायचं,’ म्हणत सुस्कारा सोडला. ‘बघू, आता माझी वेळ आली आहे. विधानपरिषदेसाठी सांगली, सातारामधून चांगला प्रतिसाद मिळतोय. माझ्यासारखा माणूस सर्वांना पाहिजे, अशी मतदारांची मागणी आहे. आजवर केलेल्या कामाची पोहोचपावती हे मतदार नक्की देतील. पक्ष बघणार नाहीत, माणूस बघतील’, असा विश्वासही दादांनी भावूक स्वरात व्यक्त केला. ‘सर्वत्र मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. सगळ्यांनी मदत करण्याचं ठरवलं आहे. आजवर हा मोहनराव कदम सगळ्यांसाठी आधार झाला आहे. आता माझ्या लढाईत कोण-कोण साथ आणि सोबत राहतंय बघुया,’ असे सांगायला दादा विसरले नाहीत. जाता-जाता ते सगळ्यांनाच भावूक करून गेले.दादा असे सांगत असताना उपस्थित सर्वजण शांतपणे ऐकत होते. शेवटी दादांनीच निघण्याची परवानगी मागितली व त्यांच्या गाड्या सांगलीच्या दिशेने रवाना झाल्या.मोहनराव दादा गेल्यानंतर काँग्रेसची सर्वच मंडळी आणि उपस्थित कुजबुजू लागली. राजकारणात असा उदार मनाचा, खुल्या अंत:करणाचा माणूस होणार नाही. असा माणूस नक्कीच निवडून येईल, असा बोलबाला करीत सगळेजण परत प्रचाराला निघून गेले.यावेळी आप्पासाहेब शिंदे, सुरेश मोहिते, सतीश पाटील, बाळासाहेब गुरव, राजाराम घोरपडे, वैभव गुरव, दिलीप पाटील, चैतन्य पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. ‘ कवठेमहांकाळ तालुका : माझे व्यक्तिगत संबंधकवठेमहांकाळ तालुक्याशी माझी पूर्वीपासून राजकीय, सामाजिक नाळ जोडली गेली आहे. माझे व्यक्तिगत संबंध आहेत. त्यामुळे मला कवठेमहांकाळ तालुक्यातून नक्की मतदार न्याय देतील. मी आजवरच्या माझ्या राजकीय प्रवासात काम करीत असताना, माझ्याकडे काम घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांचा तसेच मदत मागणाऱ्या नेत्यांचा पक्ष बघितला नाही. येणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रामाणिकपणे कामे केली. नेत्यांनाही मदत केल्यामुळे या विधानपरिषदेच्या निवडणुकीत ही सर्व माणसे, नेते, कार्यकर्ते, मतदार माझ्या पाठीशी ढाल बनून थांबतील, असा विश्वास आहे’, असेही दादांनी सांगितले.