शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बिदालमध्ये बैलांनी मारले अठरा फुटांवरील तोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 23:04 IST

दहिवडी : माण तालुक्याचे लक्ष लागलेल्या बिदाल येथे बैलाच्या तोरण मारण्याच्या शर्यती नागपंचमीदिवशी पार पडल्या. शर्यतीचे हे ३७ वे वर्ष असून, यामध्ये अठरा फुटांवरील तोरण बैलांनी मारले.यास्पर्धेत ५६ बैल सहभागी केले होते. पहिले तोरण १३ फुटांवर चढवले. त्यामध्ये प्रत्येक बैलांना तीन फेरे दिले. पहिल्या फैरीत ५६ बैलांपैकी २५ बैल दुसऱ्या ...

दहिवडी : माण तालुक्याचे लक्ष लागलेल्या बिदाल येथे बैलाच्या तोरण मारण्याच्या शर्यती नागपंचमीदिवशी पार पडल्या. शर्यतीचे हे ३७ वे वर्ष असून, यामध्ये अठरा फुटांवरील तोरण बैलांनी मारले.यास्पर्धेत ५६ बैल सहभागी केले होते. पहिले तोरण १३ फुटांवर चढवले. त्यामध्ये प्रत्येक बैलांना तीन फेरे दिले. पहिल्या फैरीत ५६ बैलांपैकी २५ बैल दुसऱ्या फेरीत तोरण शिवून दाखल झाले. त्यानंतर दुसरे तोरण १५ फुटांवर चढविण्यात आले. यामध्ये २५ पैकी ४ बैलांनी तोरण मारले. इतर २१ बैल दुसºया तोरणामधून बाद झाले. त्यानंतर शेवटचे तोरण तब्बल १८ फुटांवर बांधण्यात आले.यासाठी साहेबराव काशिनाथ बोराटे यांची दोन बैले, वसंत परशुराम जगदाळे व बाबूराव विठोबा पिसाळ यांचा प्रत्येकी १ बैल यांच्यात रंगली; मात्र या चारही बैलांना १८ फुटी तोरण न लागल्याने पहिले १५ हजार रुपयांचे बक्षीस या चार बैल मालकांना विभागून दिले.दुसºया क्रमांकाचे १३ फूट तोरण शिवलेल्या २१ बैल मालकांना रुपये १० हजारांचे विभागून देण्यात आले. तृतीय बक्षीस राखून ठेवण्यात आले. उत्कृष्ट बैल म्हणून शिवाजी नथुराम जगदाळे, अनिल महाडिक, निनाम पाडळी. शिवाजी भगवान जाधव, बिदाल यांच्या बैलाची निवड करण्यात आली. यंदा प्रथमच अरुण जगदाळे, नाना चिरमे यांच्या गायीनेही सहभाग घेतला. पंधरा फूट तोरणातून बाद झालेल्या शिवाजी नथुराम जगदाळे यांच्या बैलाने अंतिम फेरीतील कोणत्याही बैलाने न मारलेले १८ फुटी तोरण मारून आलेल्या प्रेक्षकांची मने जिंकली.आमदार जयकुमार गोरे, निवृत्त कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, सुरेखा पखाले, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, जिल्हा नियोजन अधिकारी भगवानराव जगदाळे, प्रवीण इंगवले, उपविभागीय आधिकारी लक्ष्मण बोराटे, बापूराव दडस, आयकर आयुक्त तुषार जाधव, डॉ. सत्यजित जगदाळे, धनंजय जगदाळे, गोरखनाथ बोराटे, हणमंत जगदाळे उपस्थित होते.धनंजय जगदाळे, किशोर इंगवले, सुरेश जगदाळे, हणमंत जगदाळे, तानाजी मगर, हणमंत जगदाळे, शिवाजी जगदाळे, ताराचंद जगदाळे, प्रताप भोसले, निवृत्ती जगदाळे, आबा पाटील, सतीश जगदाळे, सुरेश जगदाळे, बाळासाहेब जगदाळे, सोना चांदीवाले, अप्पा देशमुख, चंद्रकांत ढोक, बापूराव जगदाळे, मधुकर मदने, नंदकुमार पिसाळ, अजित बोराटे यांनी समालोचन व नियोजन केले.वॉटर कप स्पर्धेतील विजेत्यांचा गौरवयावेळी वॉटर कप स्पर्धेत तालुक्याला पाणीदार करण्यासाठी योगदान देणाºया तालुका समन्वयक अजित पवार, डॉ. प्रदीप पोळ, प्रफुल्ल सुतार राज्यामध्ये यश मिळविलेले टाकेवाडी, भांडवली, बनगरवाडी, भाटकी, वाघमोडेवाडी या गावांतील ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला.